Mandeshi Mahotsav 2023 : दोन वर्षानंतर ‘माणदेशी महोत्सव’ पुन्हा मुंबईमध्ये सुरु होणार आहे. यंदाचं या महोत्सवाचं हे पाचवं वर्ष आहे. 5 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान हा महोत्सव मुंबई प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात भरणार आहे. चेतना सिन्हा या माणदेशी फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा आहेत. माणदेशी भगिनींना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. माणदेशातील महिलांना त्यांच्या औद्योगिक कौशल्याशी निगडीत अनेक रोजगार या महोत्सवाच्या माध्यमातून मिळाले.  
 
यंदाच्या महोत्सवात प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी आपली कला सादर करणार आहेत. माणदेशी चॅम्पियन महिला कुस्ती त्याचबरोबर माणदेशी लोकनृत्याचा प्रकार असलेले ‘गझी नृत्य’ पाहण्यास देखील मिळणार आहे. त्याचप्रमाणे 10 लाख महिलांचा परिवार असलेल्या माणदेशातील काही शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनी आपल्या संघर्षगाथा माणदेशीच्या व्यासपीठावरुन उलगडणार आहेत.
  
यासोबत या महोत्सवात आलेले हौशी लोक कुंभारकाम करण्याचा आनंद घेऊ शकता. लाखेच्या बांगड्या बनवून घेऊ शकता, टोपली किंवा झाडू वळवून घेऊ शकता, थोडक्यात गावातली संस्कृती येथे अनुभवता येणार आहे. जर तुम्ही खवय्ये असाल तर साताऱ्याचा खर्डा, शेंगदाण्याच्या चटणीसह वेगवेगळ्या चटण्या, लोणची, ज्वारीची भाकरी, कुरड्या, मासवड्या, साताऱ्याचे जगप्रसिद्ध कंदी पेढे यांसारख्या अनेक पदार्थांची मेजवानी असणार आहे.  
 
चार दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा :
 
गुरुवार, 5 जानेवारी – पहिला दिवस -  उद्घाटन सोहळा –
10.30 वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. 
गझी लोकनृत्य सादरीकरण – सायंकाळी 6.00 वाजता.
 
शुक्रवार, 6 जानेवारी – दुसरा दिवस – प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी


यांचे भारुडाचे सादरीकरण – सायंकाळी 6.00 वाजता.
 
शनिवार, 7 जानेवारी – तिसरा दिवस -  महिला कुस्ती स्पर्धा, सायंकाळी 6.00 वाजता.
 
रविवार, 8 जानेवारी – चौथा दिवस -  माणदेशातील काही शेतकरी, उद्योजिका आणि ऍथलिट्स भगिनींची संघर्षगाथा सादरीकरण, सायंकाळी 6.00 वाजता.
 
रात्री 9.30 वाजता माणदेशी महोत्सवाची सांगता.


महत्त्वाच्या बातम्या : 


Pune vasantotsav : सूर निरागस हो! नव्या वर्षात पुणेकरांना वसंतोत्सवाची संगीत मेजवानी; तारीख जाहीर