मुंबईतील भायखळ्यात अग्नितांडव, झोपडपट्टीला भीषण आग
एबीपी माझा वेब टीम | 21 Dec 2016 07:43 AM (IST)
मुंबई : मुंबईतील भायखळा परिसरातील झोपडपट्टीला आज मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत 15 ते 20 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आणि अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि एक महिला जखमी झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी सायनमधील प्रेमनगर झोपडपट्टीतही आग लागली होती. सुदैवाने तिथेही कोणती जीवितहानी झाली नव्हती. मात्र, मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये आग लागण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत.