हेडलाईन्स ---------------------- अहमदनगर : जिल्हा सत्र न्यायालयात कोपर्डी खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात, फिर्यादीसह तीन साक्षीदारांची तपासणी होणार ---------------------- मुंबईत कुर्ल्याजवळ रेल्वेरुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत ---------------------- शिवस्मारक भूमीपूजन : उद्धव ठाकरेंची नाराजी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न, निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील 11 वाजता 'मातोश्री'वर जाणार ---------------------- चेन्नई : तामिळनाडूचे प्रधान सचिव राममोहन राव यांच्या अण्णा नगरमधील घरावर आयकर विभागाचे छापे
----------------------
महाराष्ट्र फाऊंडेशनचे (अमेरिका) पुरस्कार जाहीर :
  • ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना साहित्यातील योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार जाहीर
  • हमीद दलवाई यांना मरणोत्तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार (हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई या पुरस्कार स्वीकारणार)
  • डॉ. दाभोलकर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांना जाहीर
  • 7 जानेवारी 2017 रोजी ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार
---------------------- मनमाड : कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आक्रमक, चांदवड इथे मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्तारोको ---------------------- लोकलखाली जाणाऱ्या मायलेकींना जीवदान, आरपीएफच्या जवानांचं धाडसी साहस, मुंबईतील कुर्ला स्टेशनवरचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद ---------------------- मुंबईतील भायखळ्यात झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण ---------------------- कल्याणमध्ये नोटा बदलणारा बँक मॅनेजर अटकेत, 12 लाख जप्त, तर 16 लाखांसह आणखी एकाला अटक ---------------------- मुख्यमंत्री आणि मच्छिमार यांच्यातली बैठक निष्फळ, शिवस्मारकांची जागा बदला मच्छिमारांची मागणी ---------------------- शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय समृद्धी हायवेसाठी जमीन घेणार नाही, शहापूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, 'माझा'च्या वृत्तानंतर सरकारला जाग ---------------------- राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांना संपत्ती जाहीर करावी लागणार, सामान्य प्रशासन विभागाचा शासकीय आदेश, संपत्ती जाहीर न केल्याच कारवाईचा इशारा ---------------------- चेन्नई कसोटी जिंकून टीम इंडियाने इंग्लंडवर मिळवला 4-0 असा ऐतिहासिक विजय, रवींद्र जाडेजाने 7 विकेट्स काढून बजावली मोलाची भूमिका ---------------------- एबीपी माझा वेब टीम