मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली परिसरात एका निर्माणाधीन इमारतीमध्ये बांधकाम (Building Construction) सुरु असताना भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बोरिवली (Borivli) पश्चिमेला असणाऱ्या कल्पना चावला चौकातील सोनी वाडी येथील इमारतीमध्ये हा अपघात झाला. याठिकाणी एका 24 मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. 16 व्या मजल्यावर कामकाजासाठी एक लोखंडी मचाण उभारण्यात आली होती. या लोखंडी मचाणीवर उभे राहून कामगार काम करत होते. परंतु, दुपारी सव्वाच्या सुमारास ही लोखंडी मचाण अचानक कोसळली. त्यामुळे मचाणीवर उभे असलेले कामगार लोखंडी पाईप्सच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या लोखंडी पाईप्सच्या वजनाखाली दबलेल्या कामगारांना तातडीने बाहेर काढून नजीकच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
Mumbai News: मोठी बातमी: बोरिवलीत निर्माणाधीन इमारतीमध्ये लोखंडी मचाण कोसळली, तीनजण जागीच ठार, एकाची प्रकृती गंभीर
सत्यम सिंह | Rohit Dhamnaskar | 12 Mar 2024 03:53 PM (IST)
Borivali building accident: बोरिवली (Borivli) पश्चिमेला असणाऱ्या कल्पना चावला चौकातील सोनी वाडी येथील इमारतीमध्ये हा अपघात झाला. याठिकाणी एका 24 मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. 16 व्या मजल्यावर कामकाजासाठी एक लोखंडी मचाण उभारण्यात आली होती.
Mumbai Building Accident