मुंबई: कट्यार काळजात घुसलीमधील गाण्य़ांमार्फत आपल्या शास्त्रीय गायकीने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध करणारे महेश काळे. त्यांच्या आवाजाची जादू साऱ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर परदेशातही आहे. अनेक संगीत नाटकांमधून त्यांनी मुख्य भूमिका गाजवल्या आहेत. त्यांना  'माझा सन्मान २०१६'ने गौरवण्यात आले.

 

महेश काळेंचा थोडक्यात परिचय 

 

गाणं हीच त्याची ओळखवयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी तो पहिल्यांदा रसिकांसमोर गायला आणि त्याच्या निरागस सुरांनी सा-यांना मोहून टाकलं. शास्त्रीय गायक महेश काळे…..तिथून सुरु झालेला महेशच्या गात्या गळ्याचा प्रवास म्हणजे त्याच्या लक्षावधी चाहत्यांच्या आयुष्यातील सुरेल चांदणं. पं. जितेंद्र अभिषेकींसारखा गुरु लाभल्यानं महेश काळेच्या गाणं खऱ्या अर्थानं फुलत गेलं अन् स्वत:ची शैलीही त्याने निर्माण केली. पुढे पुणे विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी मिळवणाऱ्या महेशने अमेरिकेतल्या सँटा क्लारा विद्यापीठातून इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या विषयात मास्टर डीग्रीही मिळवली.

 

सूरांच्या मोहिनीमुळे संगीत हाच त्याचा श्वास होता अन् राहिलाय... हे त्याच्या ताना मुरक्यांमधून आपल्याला जाणवतं.  आजवर त्याने जगभरातल्या अनेक देशात हजाराहून अधिक शास्त्रीय संगीताच्या मैफली केल्यात. अमेरीकेतल्या शंभराहून अधिक विद्यार्थ्यांना तो संगीताची संथा देतोय.

 

शास्त्रीय संगीताच्या मैफली आणि संगीत नाटकांच्या रसिकांपूरता मर्यादित असलेला महेश खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला तो कट्यार काळजात घुसली या सिनेमातून. या सिनेमात त्याने गायलेली गाण्यांनी लहानांपासून वृद्धांच्या मनावर गारूड केलं.  या सिनेमाच्या पार्श्वगायनसाठी महेशला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अभिजात शास्त्रीय संगीताला जगभरात पोहोचवणाऱ्या या अभ्यासू अन् मनस्वी गायकाला एबीपी माझाचा सलाम !!!

 

ललिता बाबरचा माझा सन्मान २०१६ पुरस्काराने गौरव