मुंबई : कोरोनाचं संकट आज जगावर आहे. या संकटाचा सामना हिमतीने करण्याची गरज आहे. कोरोनासोबत जगण्यासाठी सकारात्मक आणि आत्मविश्वास सगळीकडे निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं. कोरोनाचं संकट आहे पण लॉकडाऊन सुरु ठेवणे बंद केलं पाहिजे. आज लॉकडाऊनमुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावाचे नियम पाळून आपण जनजीवन सुरळीत केलं पाहीजे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.
लॉकडाउन वाढवला गेला तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट येतील. कोरोनावरची लस मिळेपर्यंत तारेवरची कसरत करावीच लागेल. सोशल डिस्टन्सिंग, हात धुणे, मास्क लावणे हे उपाय योजून उद्योग सुरु करावेच लागतील. संपूर्ण लॉकडाउन योग्य नाही, असंही नितीन गडकरींनी सांगितलं. कोरोनाचं संकट जगावर आहे. मात्र लॉकडाउन करणे हा एकमेव उपाय असं कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. संक्रमण न वाढता आपलं जीवन सुरळीत करणं हे आव्हान आपल्याला पेलावचं लागणार आहे असं नितीन गडकरींनी सांगितलं.
भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? नितीन गडकरी म्हणतात...
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज होत आहे.
इतर बातम्या
- Majha Maharashtra Majha Vision 2020 | शटडाऊन, लॉकडाऊन नको; आता सगळं सुरु करा : राज ठाकरे
- Majha Maharashtra Majha Vision 2020 | उद्धव ठाकरे मला टीव्हीवर दिसले, कारभार दिसलाच नाही : राज ठाकरे
Majha Maharashtra Majha Vision | भाजप भविष्यात शिवसेनेसोबत युती करणार का? काय म्हणाले नितीन गडकरी?