Mahayuti Sabha at Shivaji Park : मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) पाचवा टप्पा येत्या 20 मे रोजी पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत (Mumbai News) सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पाचव्या टप्प्यातील महायुतीची (Mahayuti) सांगता सभा आज दादरमधील (Dadar) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार आहे. आजच्या सभेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उपस्थित राहणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील हजेरी लावणार आहेत. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे आजच्या महायुतीच्या सभेकडे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष लागलं आहे. तसेच, आज सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो देखील होणार आहे. याच पार्श्वभूमीवर दादर परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.  


वाहतुकीच्या बदलांबाबात माहिती देणारं ट्वीट Mumbai Traffic Police या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आलं आहे. ट्वीटमध्ये सांगण्यात आल्यानुसार, "17 मे 2024 रोजी शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित 'जाहीर सभा' मध्ये नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी 10 ते रात्री 12 दरम्यान करण्यात आलेल्या वाहतूक नियोजनाची नागरिकांनी नोंद घ्यावी." यासोबतच एक पत्रकही ट्वीटमध्ये जोडण्यात आलं आहे. 


वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था 


स्वातंत्रवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनी: श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन ते यस बँक जंक्शन. (पर्यायी मार्ग श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण घेवून एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले मार्ग)


स्वातंत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी यस बँक जंक्शन ते श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन (पर्यायी मार्ग दांडेकर चौक येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्गे राजाबढे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड मार्गे गोखले रोड किंवा एन. सी. केळकर रोड)






नो पार्किंग झोन कोणते?



  1. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग : बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन, माहिम. 

  2. संपुर्ण केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर 

  3. संपुर्ण एम. बी. राऊत मार्ग 

  4. पांडुरंग नाईक मार्ग 

  5. दादासाहेब रेगे मार्ग 

  6. दिलीप गुप्ते मार्ग: शिवाजी पार्क गेट क्र. 4 ते शितलादेवी रोड 

  7. एल. जे. रोड : गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल 

  8. एन. सी. केळकर मार्ग: हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन 

  9. टी. एच. कटारीया मार्ग गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन 

  10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड महेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन 

  11. टिळक रोड:- कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आर. ए. किडवाई रोड 

  12. खान अब्दुल गफारखान रोड सी लिंक गेट ते जे. के. कपुर चौक ते बिंदु माधव ठाकरे चौक. 

  13. थडानी मार्ग:- पोददार हॉस्पीटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक. 

  14. डॉ. अॅनी बेझंट रोड पोद्दार हॉस्पीटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन.


वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था 


बसेस पार्क करण्याकरीता संपुर्ण सेनापती बापट मार्ग, माहिम रेल्वे स्थानक ते टिळक ब्रीज पर्यंत, रेती बंदर, लेडी जहांगिर रोड, रुईया जंक्शन ते पाच गार्डन ते सेंड जोसेफ स्कूल, नाथालाल पारेख मार्ग, सेंड जोसेफ स्कूल ते खालसा कॉलेज, आर. ए. के. 4 रोड, अरोरा जंक्शन ते लिज्जत पापड जंक्शन ते एडस् रुग्णालय पर्यंत, लोढा सार्वनिक वाहनतळ, सेनापती बापट मार्ग, कामगार मैदान, कोहिनुर सार्वजनिक वाहनतळ, इंडिया बुल फायनांन्स सेंटर सार्वजनिक वाहनतळ, रहेजा सार्वजनिक वाहनतळ, ग्लास्को जंक्शन ते दिपक टॉकी जंक्शन पर्यंत, सुदाम काळू अहिरे मार्ग, नारायण हर्डीकर मार्ग हार्डीकर जंक्शन ते सेक्रेट हार्ड हायुस्कूल पर्यंत, सासमिरा रोड.


महायुतीच्या सभेची सांगता मोदींच्या भाषणानं 


मुंबईत आज महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन मोठ्या सभा होत आहेत. महाविकास आघाडीच्या सभेसाठी शरद पवार, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर असतील मात्र प्रश्न हा आहे की, मुख्य भाषणाची आणि शेवटच्या भाषणाची संधी कुणाला मिळणार? तर दुसरीकडे मनसेची स्थापना झाल्यानंतर शिवाजी पार्कवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांना शेवटचं भाषण करता येणार नाही.  


पाहा व्हिडीओ : PM Narendra Modi Sabha Mumbai : नरेंद्र मोदी, राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्कवर महायुतीची सभा



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mahayuti Sabha at Shivaji Park : उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी मोदी-राज एकत्र येणार; शिवाजी पार्कवर आज ऐतिहासिक सभा!