Maharashtra Winter Assembly Session LIVE Updatesभांडुप येथील महानगरपालिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसुतिगृहामध्ये 4 दिवसात चार बाळांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद आज विधिमंडळात उमटले. या प्रकरणी विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर सरकारनं या प्रकरणाशी संबंधित  अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा केली.  आरोग्य विभागाचे मेडिकल अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. 


मुंबई महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहमध्ये एनआयसीयू युनिटमध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेफ्टीक इन्फेक्शनमुळे या मुलांचा मृत्यू झाला असल्याचा रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या पालकांना कळविण्यात आलं होतं. आता रुग्णालयात आणखी तीन बाळ आहेत त्यांनाही असेच इन्फेक्शन झाल्याचे समोर आले आहे. 
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर बोलताना म्हटलं की,  महानगरपालिकेमध्ये असा प्रकार होत असताना का लक्ष दिलं नाही? दिवसा ढवळ्या हा खून झाला आहे. तात्काळ कारवाई करा. आणखी किती बालकांचा मृत्यू होणार आहे, अशा शब्दात फडणवीसांनी संताप व्यक्त केला. 


सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्याने या विषयावर एकत्र यावा आणि चर्चा करावी.  हा गंभीर विषय आहे.  यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  सेफ्टीक शॉकमुळे ही घटना घडली आहे.  चार बालकांचा मृत्यू झाला आहे आणि एक बालक गंभीर आहे.  तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. 


यानंतरही काही निर्णय होत नसल्यानं विरोधकांनी गदारोळ केल्यानं काही वेळ सभागृह स्थगित करण्यात आलं  फडणवीस यांनी नंतर म्हटलं की, या बालकांच्या मृत्यूला जे जबाबदार असेल त्यांना तात्काळ निलंबित करा. हा गंभीर विषय आहे. मंत्री महोदय यांनी उभं राहून कारवाई करण्याची घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली.  


यानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, विरोधी पक्षनेत्यांनी जी मागणी केली आहे यासंदर्भात सरकार गंभीर आहे. झालेली दुर्घटना गंभीर आहे. मात्र याची चौकशी करुन कारवाई करु.  दोषीवर कारवाई करु मात्र याची चौकशी करावी लागणार आहे. मात्र यावरही विरोधकांचे समाधान न झाल्यानं अखेर एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकारी निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याची घोषणा केली.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha