Maharashtra Unseasonal Rain: ऐन दिवाळीत मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), नवी मुंबईत (Navi Mumbai) अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली. कल्याण डोंबिवलीसह कळवा, मुंब्रा, ठाणे आणि ग्रामीण परिसरात वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. तर मुंबई उपनगरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली.


मुंबईसह उपनगरांत पावसाची हजेरी 


मुंबई उपनगरात अचानक पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी, भांडुप , मुलुंड, गोवंडी अशा सर्वच परिसरात जोरदार पाऊस कोसळला आहे. या अवकळी पावसानं मुंबईकरांची भलतीच तारांबळ उडाली आहे. सुमारे अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस कोसळत होता. यामुळे दिवाळी साठी खरेदीला किंवा भेटी गाठी घेण्यास बाहेर पडलेल्या मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली होती.


सुमारे अर्ध्या तासापासून मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस कोसळला. यामुळं दिवाळीसाठी खरेदीला किंवा भेटीगाठी घेण्यास बाहेर पडलेल्या मुंबईकरांची मोठी तारांबळ उडाली. नवी मुंबऊतही जोरदार पाऊस पडला. नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे भागात जोरदार पाऊस पडला. अचानक पडलेल्या पावसामुळं लोकांची तारांबळ उडाली. कल्याण डोंबीवलीसह कळवा, मुंब्रा, ठाणे आणि ग्रामीण परिसरात वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाला आहे. 


रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पाऊस 


रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात सलग चौथ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला. कापणीला आलेल्या भात शेतीला या पावसाचा फटका बसला. दरम्यान किनारपट्टी भागाची तुलना करता सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये असलेल्या भागात पाऊस जास्त कोसळला. त्यामुळे त्याचा परिणाम वीज पुरवठावरही झाला. अनेक भागात विजेचा लपंडाव देखील पाहायला मिळाला.


मुसळधार पावसामुळे दहा घरांवर झाड कोसळलं 


कल्याण डोंबिवली आणि परिसरामध्ये अचानकच अवकाळी पावसानं हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामध्ये कल्याण डोंबिवली परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. पावसाबरोबरच सुसाट वारा येत असल्यानं कल्याणच्या पिसवली गावातील दहा घरांवर झाड कोसळल्यानं घरांचं नुकसान झालं आहे. या घटनेत तीनजण जखमी झाले आहेत. कोसळलेल्या झाडाची तक्रार कल्याण महानगरपालिकेकडे स्थानिक रहिवाशांनी दिली होती. मात्र, महापालिकेनं वेळेत कारवाई न केल्यामुळं हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.