Maharashtra Unlock : राज्य शासनाच्या निकषानुसार आणि नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 95 टक्क्यांवर पोहोचलं असून, यामुळं मुंबई यामध्ये तिसऱ्या गटात येत आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.


मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या दुपटीचं प्रमाण 515 दिवसांवर पोहोचला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला दोन आठवड्यांची आकडेवारी पाहता मुंबईचा पॉझिटीव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत आहे. ज्यामुळं मुंबई ही तिसऱ्या लेवलपर्यंत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. येत्या काळात पहिल्या आठवड्यात मुंबईत तिसऱ्या टप्प्यावर असली तरीही येत्या काळात मुंबई पॉझिटीव्हिटी रेटमध्ये दुसऱ्या टप्प्यात आल्यास त्यानुसार नियम लागू केले जाती. मुख्यमंत्री कार्यालय किंवा खुद्द मुख्यमंत्री काही वेळात याबाबतच्या सूचना जाहीर करतील असंही त्या म्हणाल्या. 


Maharashtra Unlock : जाणून घ्या अनलॉकच्या अधिसूचनेनुसार लग्नसोहळ्यांसाठी कोणते नियम


राज्य सरकारच्या निकषांनुसार सायंकाळी मुंबईतील व्यवहारांसाठीचं एक परिपत्रक काढण्यात येईल. तेव्हा देशाच्या आर्थिक राजधातीनील या अनलॉकचं चित्र अधिक स्पष्ट होईल अशी स्पष्टोक्ती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. 


विरोधी पक्षांकडून शब्दांचा झिम्मा


विरोधी पक्षाकडून लसीचं ग्लोबल टेंडर आणि इतरही नियोजनाच्या बाबतीच होणारी टीका पाहता या पक्षाकडून शब्दांचा झिम्माच सुरु आहे. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपलं लक्ष्य काय आहे त्यावरच लक्ष केंद्रीत करण्यास आमचं प्राधान्य आहे, ही बाब महापौरांनी ठणकावून सांगितली. टीका करण्यापेक्षा नागरिकांच्या हिताचा विचार विरोधी पक्षानंही करावा असा आग्रही सूर यावेळी त्यांनी आळवला. 


पाच टप्प्यांमध्ये अनलॉक 


अनलॉक करत असताना 5 स्तर तयार करण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे.


पहिल्या टप्प्यात मॉल, थिएटर आणि सर्व दुकानं सुरळीत राहतील. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या शहर आणि जिल्ह्यांमध्ये मॉल आणि थिएटर्स 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील शहर आणि जिल्ह्यांमध्ये निर्बंधासह सेवा राहिल.