Maharashtra Unlock : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन, संचारबंदीचे नियम लागू करण्यात आले होते. राज्यातील वाहतुकीसोबतच कार्यक्रम, समारंभ आणि लग्नसोहळ्यांवरही याचे थेट परिणाम पाहायला मिळाले होते. कोरोना नियमांच्या धर्तीवर संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंत्यविधीपासून लग्नसोहळ्यांपर्यंत उपस्थितांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले.
लग्नसोहळ्यांसाठी अवघ्या 25 पाहुण्यांची उपस्थिती सांगण्यात आल्यामुळं अनेक कुटुंबांमध्ये मोठा गोंधळही पाहायला मिळाला. काहींनी याच परिस्थितीत विवाहसोहळे आवरतेही घेतले. पण, आता मात्र या निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली गेली आहे.
राज्य शासनाच्या नियमावलीनुसार पहिल्या लेवलमध्ये येणाऱ्या ठिकाणी लग्नसोहळे कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरु राहतील. तर, दुसऱ्या टप्प्यामध्ये लग्नसोहळ्यांमध्ये 50 टक्के क्षमतेनं सोहळा पार पाडण्याची अनुमती देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यासाठीही 50 टक्के क्षमतेचेच नियम लागू असतील. चौथ्या लेवलमध्ये लग्नसोहळ्यांसाठी 25 उपस्थितांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर, पाचव्या टप्प्यामध्ये हे नियम आणखी कठोर करत लग्नसोहळा फक्त कुटुंबीयांपुरताच सीमीत ठेवण्यात आला आहे.
लग्नसोहळ्याबाबत राज्य शासनाने दिलेले हे नवे नियम पाहता आता पुन्हा एकता लग्नसराईचे दिवस अखेरच्या टप्प्यात असतानाच एकाएकी या विवाहसोहळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पहिल्या स्तरांमध्ये येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या स्तरात आहे. अधिसूचनेनुसार पहिल्या टप्प्यात येणारे जिल्हे आणि शहरांमध्ये कमीतकमी निर्बंधित असतील, तर तर पाचव्या टप्प्यातील निर्बंध अधिक कडक असतील. आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात आहे.
In Pics : पाच टप्प्यांत महाराष्ट्र अनलॉक होणार, कसं ते पाहा एका क्लिकवर
कोणतं शहर कोणत्या टप्प्यात?
जिल्हा भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के) पॉझिटिव्हिटी दर (टक्के)
पहिला टप्पा
अहमदनगर २४.४८ ४.३०
चंद्रपूर ९.३० ३.०९
धुळे ४.२५ २.५४
गोंदिया ६.३२ २.३७
जळगाव १५.१७ १.६७
जालना १७.६५ २.०५
लातूर १५.१३ ४.२४
नागपूर ८.१३ ३.८६
नांदेड ४.२८ १.९३
यवतमाळ १३.५८ ४.१९
दुसरा टप्पा
हिंगोली २९.३४ ४.३७
नंदुरबार २९.४३ ३.३१
तिसरा टप्पा
मुंबई उपनगर १२.५१ ५.२५
ठाणे १९.२५ ७.५४
नाशिक १८.७१ ७.७५
औरंगाबाद २०.३४ ५.३८
अकोला ४३.०४ ७.७४
अमरावती २८.५९ ६.५६
बीड ४७.१४ ८.४०
भंडारा ४.४१ ७.६७
गडचिरोली ५.९२ ६.५१
उस्मानाबाद ३१.०९ ७.७०
पालघर ४८.९३ ५.११
परभणी १६.०२ ७.१०
सोलापूर ४४.३९ ६.७८
वर्धा ४.०४ ७.५७
वाशिम १८.९० ५.१९
टप्पा चौथा
पुणे २०.४५ १३.६२
बुलडाणा ७.७१ १०.०३
कोल्हापूर ७१.५० १५.२५
रायगड ३८.३० १९.३२
रत्नागिरी ५१.८१ १६.४५
सांगली ४७.९४ १४.०१
सातारा ६१.५५ १५.६२
सिंधुदुर्ग ६६.५६ १२.७०