मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.  राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका लागला आहे. तर 87.27 टक्के मुलं पास झाली

दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 89.41 टक्के   

कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. तर SMS सेवेद्वारेही निकाल पाहता येणार आहे. यासाठी 57766 या नंबरवर MHSSC<space><seat no> एसएमएस करायचा आहे.

या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :

www.mahresult.nic.in

www.sscresult.mkcl.org 

www.maharashtraeducation.com  

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

https://mahahsscboard.maharashtra.gov.in/ 

कसा पाहाल निकाल?

दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.

समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

संबंधित बातम्या 

दहावीचा निकाल आज, 'या' तीन वेबसाईटवर निकाल पाहा