मुंबई : कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात करत 980 रुपयांऐवजी 780 हा दर निश्चित करण्यात आल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते. ते यावेळी म्हणाले, राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.


कोरोनाची चाचणी आता आणखी स्वस्त झाली आहे. कोरोना चाचणीत 280 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी आता 700 रुपये मोजावे लागणार आहे. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा 0.21 इतका असून केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.




अजून धोका टळलेला नाही : आरोग्यमंत्री
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, दिवाळीनंतर ही संख्या पुन्हा वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना अजूनही गेला नाही. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. जोपर्यंत कोरोना लस येत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी झाला असून रिकव्हरी रेट वाढला आहे.


राज्यात आज 3442 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
राज्यात आज 3442 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4395 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1766010 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 71356 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.60% झाले आहे.


संबंधित बातम्या :
मॉडर्ना कंपनीच्या कोविड लसीला अमेरीकेकडून हिरवा झेंडा


कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी; पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा मानस


Vidhansabha Winter Session महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं UNCUT भाषण