Shiv Sena Crisis : ठाकरे कुटुंबीयांचे (Uddhav Thackeray) निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भूषण देसाई यांनी पक्ष प्रवेश केला. आमची भूमिका आणि सरकारचे काम पाहून अनेकजण पक्षात प्रवेश करत आहेत. शिवसेनेचे आमदार आणि इतर नेत्यांप्रमाणे त्यांनीदेखील पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुंबईत यांच्याकडे सत्ता होती गेल्या अनेक वर्ष पण त्यांना काही करता आले नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय. आम्ही करत असलेल्या कामामुळे भूषण देसाई प्रभावी झाले. त्यानंतर त्यांनी पक्षात काम करण्याची इच्छा दर्शवली. भूषण यांनी काम करणाऱ्या लोकांसोबत राहायचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
यावेळी भूषण देसाई यांनी म्हटले की, बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत. महाराष्ट्राचा विकास आणि बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धतही माहीत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भूषण देसाई यांनी म्हटले.
वडिलांना कल्पना दिली होती...
शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांना माझ्या निर्णयाबद्दल आधीच कल्पना दिली होती, असे भूषण देसाई यांनी स्पष्ट केले. माझ्या वडिलांची एक राजकीय भूमिका असू शकते. मात्र, माझी स्वत: ची एक वेगळी राजकीय भूमिका असू शकते, असेही त्यांनी म्हटले.
भूषण देसाईंवर भाजपचे आरोप
चार महिन्यांपूर्वी भाजपने भूषण देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी भूषण देसाई यांच्यावर वसुलीचे गंभीर आरोप केले होते. भूषण देसाई यांच्यावर एजंटगिरी करत गैरव्यवहार केला असल्याचा आरोप केला होता.
गजाजन किर्तीकर शिंदे गटात आणि मुलगा ठाकरे गटात...
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, त्यांचा मुलगा अमोल किर्तीकर हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहे, अमोल किर्तीकर सध्या शिवसेना ठाकरे गटात उपनेते पदावर आहेत,
इतर महत्त्वाच्या बातम्या: