Maharashtra Politics: 1 जुलै रोजी ठाकरे गट (Thackeray Group) पालिकेविरोधात विराट मोर्चा काढणार आहे. पण त्याच दिवशी ठाकरेंना धक्का बसणार आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) उद्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत. राहुल कनाल यांनी स्वतः ट्वीट करत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, पक्षाला जाहीर रित्या जय महाराष्ट्र करत असल्याचंही राहुल कनाल यांनी म्हटलं आहे. 


राहुल कनाल यांनी ट्वीट केलंय की, "दुःख होतंय!!! हे कोणी केलंय हे चांगलंच माहीत आहे पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलं आहे त्यांना न ऐकता काढून टाकणं म्हणजे अहंकार आहे आणि तुम्ही मला हटवू शकलात पण त्या लोकांना नाही, ज्यांनी रात्रंदिवस काम केलंय. तरीही चलो अच्छा है सबको पता चले के इगो और अॅरोगन्स क्या होता है!!!" 


राहुल कनाल शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनेनं कनाल यांच्या वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयानं अधिकृतरित्या ही बातमी दिली आहे. 






वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या युवासेनेच्या पदांना स्थगिती


आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर युवासेनेनं कनाल यांच्या वांद्रे पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती दिली आहे. युवासेना मध्यवर्ती कार्यालयानं अधिकृतरित्या ही बातमी दिली आहे. युवासेनेच्या याच इन्स्टा पोस्टचा स्क्रिनशॉर्ट शेअर करत राहुल कनाल यांनी नाराजी व्यक्त करणारं ट्वीट केलं आहे. तसेच या ट्वीटमध्ये राहुल कनाल यांनी पक्षाची साथ सोडल्याचं एकप्रकारे जाहीरच केलं आहे.