सध्या काहीही व्हायरल करायचं असेल तर सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. महाराष्ट्र पोलीस देखील यात मागे नाही. कोरोना महामारीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रबोधन करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि स्वच्छता पाळण्यासाठी सूचना देण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस देखील अशाच प्रकारचे प्रबोधन करत आहे. मात्र, यासाठी त्यांनी वेगाने व्हायरल होणाऱ्या मीम्सचा आधार घेतला आहे. हे मीम्स हटके स्टाईलचे असल्याने वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी मागील काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवरुन घरीच थांबा, मास्क घाला, करोनाचा फैलाव होणार नाही यासंदर्भात काळजी घ्या, ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या असे एक ना अनेक जनजागृतीचे संदेश अगदी हटके स्टाइलने मिम्सच्या भाषेत देण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आता महाराष्ट्र पोलिसांनी मराठी मालिकांची नाव वापरुन मास्क आणि करोनासंदर्भातील काही पोस्टर्स ट्विट केलेत.
काय आहेत मीम्स
मीम्ससाठी मराठी मालिकांच्या नावांचा खुबीनं वापर करण्यात आला आहे.
नाटक आणि चित्रपटातील व्यक्तीरेखा देखील वापरण्यात आल्या आहेत.
मीम्स तयार करताना विनोदाचाही चांगला वापर केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना इशारा देण्यात आला आहे.
काही मीम्ससाठी हिंदी वेबसिरिजचा आधार घेण्यात आला आहे.
तर काही इंग्रजीतही मीम्स व्हायरल करण्यात आले आहे.
मास्क कसा वापरू नये हे यातून सांगण्यात आलं आहे.