मुंबई : विकासासाठी फंड मिळावा यासाठी आतुरतेने वाट पहावी लागत होती मात्र आपल्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर फंड आणला जात आहे. दिल्लीतून फंड आला पाहिजे असे सांगतानाच गोव्यात प्रचार करत होतो इतर राज्यात पण शिवसेना निवडणूक लढत आहे. त्यामुळे 2024 नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल असे सूचक वक्तव्य करत शिवसेनेचे 2024  चे लक्ष दिल्ली असल्याचे सूचक इशारा मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी मुंबई आपली आई असून कल्याण डोंबिवली आपली मावशी असल्याने या भागाच्या विकासासाठी दुर्लक्ष करून चालणारच नाही असे सांगितलं. डोंबिवलीमध्ये विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वि दा सावरकर सभागृहाचे तसेच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नदी किनारा विकसित करणे, डायलिसीस सेंटरचे उद्घाटन करणे आणि औद्योगिक क्षेत्रातील 55 कोटीच्या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ श्रीकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री ठाकरे यांनी राज्यातील 51 टक्के महराष्ट्राचे शहरीकरण झाले असून या वाढत्या शहरीकरणाबरोबर वाढणाऱ्या लोकसंख्येला मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात आजवरच्या इतिहासात कधीही नव्हता इतका निधी आणला नाही. डोंबिवली कल्याण शहराकडे आपले विशेष लक्ष असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी मुंबई ही आपली आई असून कल्याण डोंबिवली आपली मावशी असल्याने या भागाच्या विकासासाठी दुर्लक्ष करून चालणारच नाही असे सांगितलं 


एमएमआर रिजनचे विकास करणे हे आमचे ध्येय : आदित्य ठाकरे


कल्याण डोंबिवलीमधील विविध विकास कामांचा आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं . याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांनी कोव्हिड सारख्या कठीण काळात देखील या ठिकाणी रस्त्याचे काम असेल पुलाचे काम असतील ते  सुरू होते,एकंदरीतच पूर्ण एम एम आर रिजनचे विकास करणे हे आमचे ध्येय आणि धोरण असल्याचे सांगितले.


राऊत यांनी मॅच सुरू केली आता पुढची बॅटिंग बघू


संजय राऊत यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषेदेत किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत वसई येथील कंपन्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले .याबाबत आदित्य ठाकरे यांनी राऊत यांनी आता मॅच सुरू केली आहे आता पुढची बॅटिंग बघू अशी प्रतिक्रिया दिली आहे


ड्रीम प्रोजेक्ट्सला विरोध नाही - आदित्य ठाकरे


नागपूर-अजनी वन प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे .हा प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. पर्यावरणवाद्यांना आदित्य ठाकरे यांनी पाठींबा दर्शवला आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी या प्रोजेक्टला वैयक्तिक विरोध नाही. वन वाचवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल त्याचा विचार करतोय असे सांगितलं.


रोजगाराचे नुकसान होऊ नये याची दक्षता - आदित्य ठाकरे 


डोंबिवली एम आय डी सी मधील 156 कंपन्या स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उद्योजकांनी याबाबत विरोध केला  आहे. याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी कुठेही रोजगाराचे नुकसान होऊ नये याची दक्षता आम्ही घेत आहोत. प्रदूषण होत आहे त्यामुळे जिथे रेड इंडस्ट्रीसाठी जागा आहे तिथे स्थलांतर करण्यात येत आहे. तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून आणि रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.