Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये आणि भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी भाजपच्या वतीने भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे आमदारांची जबाबदारी देण्यात येणार आहे. नेमकी ही जबाबदारी काय असेल आणि त्यात कोण कोण आहेत.  
 
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मैदानात दिला आणि आता मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपनं तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत भाजपाला 14 मतांची गरज आहे. ही मतं मिळविण्याची जबाबदारी भाजपनं दिग्गज नेत्यांवर दिली आहे. या निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भाजपनं ही मोहीम फत्ते करण्यासाठी त्रिमूर्तींवर विशेष जबाबदारी दिली आहे.


राज्यसभेसाठी या त्रिमूर्तीवर जबाबदारी!


गिरीश महाजन


आशिष शेलार


प्रसाद लाड 


 अपक्ष आणि मित्र पक्षांच्या मदतीने भाजपचे संख्याबळ भाजपचे 112 आहे. भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊन भाजपकडे 28 मते राहतात तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपला 14 मतांची गरज आहे. ती जुळवणे भाजपसाठी मोठं आव्हान असेल.
 
भाजप सत्तेत असताना गिरीश महाजन यांची संकटमोचक म्हणून ओळख होती. आता हाच पत्ता राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने वापरायचा ठरवला आहे. तर गेल्यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत आशिष शेलार यांनी चमकदार कामगिरी केली होती, आता त्यांना राज्यसभेची मोहीम दिली आहे, तर निवडणुकांचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी प्रसाद लाड यांच्यावर देण्यात आली आहे. आता हे त्रिमूर्ती भाजपला विजय मिळवून देतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. 


महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल


सत्ताधारी महाविकास आघाडीचं संख्याबळ


शिवसेना - 55
राष्ट्रवादी - 53 
काँग्रेस - 44
बहुजन विकास आघाडी - 3 
समाजवादी पार्टी - 2
प्रहार जनशक्ती पार्टी - 2 
माकप - 1
शेकाप - 1 
स्वाभिमानी पक्ष - 1 
क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1 
अपक्ष - 9


सत्ताधाऱ्यांकडे एकूण संख्याबळ - 172


......................


विरोधी पक्ष भाजपकडील संख्याबळ 


भाजप - 106
जनसुराज्य शक्ती - 1 
राष्ट्रीय समाज पक्ष - 1 
अपक्ष - 4


विरोधाकडे असलेले एकूण संख्याबळ - 112


इतर महत्वाच्या बातम्या


Rajya Sabha Election: भाजपनं पैसा वाया घालवू नये, सामाजिक कार्यात वापरावा, चटक लावू नये- संजय राऊत


राज्यसभा निवडणुकीचा धुरळा; आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भाजप, मविआ लागले कामाला


Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची घोडे कुठे अडले?'


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI