मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा 3 मेपर्यंत अल्टिमेटम दिला आहे.   या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस (Mumbai Police) सतर्क  झाली.  या दिवशी मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाली आहे.  शहरात कोठेही अनुचित प्रकार घडल्यास पोलिस पाच मिनिटात पोहचणार असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे.


 राज ठाकरेंच्या भोंग्यावरील अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीसांची तयारी पूर्ण झाली आहे. दंगा झाल्यास मुंबई पोलीस पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचणार आहे. तसेच एसआरपीएफचे 57 पथकं मुंबईत तैनात करण्यात आली आहे. तर मुंबईत 6 दंगल नियंत्रण पथकं तैनात ठेवणार


शहराचे संवेदनशील आणि असंवेदनशील परिसराची पाहणी करण्यात आली आहे. शहरातील 94 पोलीस स्थानकात 1504 पॉइंट्स बनवण्यात आले आहे. प्रत्येक पोलीस स्थानकात 4 बीट चौकी असते. या बीटमध्ये 4 पॉईंट्स ठरवण्यात आले आहे. A,B,C,D याचा अर्थ असा की, प्रत्येक पोलीस स्थानकात 16 पॉइंट्स असणार आहे. 24 तास पेट्रोलिंग केले जाणार आहे. 


मुंबई पोलीसांकडे सध्या कोणताही अनुचित प्रकार घडल्यास घटनास्थळी  तातडीने पोहचण्याची क्षमता असणारी 33 पथकं  आहेत. 
15 पथकं ही लॉ अॅन्ज ऑर्डरचे पालन करण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. यामध्ये लोकल आर्म्स डिव्हीजन पोलिसांचा देखील समवेश करण्यात आला आहे. प्रत्येक पथकात Riot control police ची 6 पथके तयार करण्यात आली आहे.  RCP च्या प्रत्येक पथकात 14 जण आहेत. तसेच डेल्टा टीम देखील तयर करण्यात आली आहे. प्रत्येक पोलीस स्थानकात दोन पोलीस कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहे. 


संबंधित बातम्या :