Covid Death In India: जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत एक अहवाल जारी केला आहे. त्या अहवालानुसार, भारतात कोरोनामुळे 47 लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे पाच लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने WHO च्या अहवालावर आक्षेप नोंदवला आहे.


WHO च्या या आकडेवारीवर भारत सरकारने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, जागतिक आरोग्य संघटनेने ज्या तंत्राने किंवा मॉडेलद्वारे ही आकडेवारी गोळा केली आहे, ती योग्य नाही. जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या आक्षेपानंतरही, डब्ल्यूएचओने जुन्या पद्धतीने आणि मॉडेल्सद्वारे मृत्यूची आकडेवारी जाहीर केली आहे. यात भारतातील परिस्थितीचा योग्य आढावा घेण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले आहे.


WHO ने जाहीर केलेली आकडेवारी फक्त 17 राज्यांची आहे, यावरही सरकारने भर दिला. केंद्राच्या म्हणण्यानुसार, ती कोणती राज्ये आहेत, हे देखील डब्ल्यूएचओने स्पष्ट केले नाही. ही आकडेवारी केव्हा जमा झाली, हे अद्याप कळलेले नाही. याशिवाय डब्ल्यूएचओने गणितीय मॉडेल्सचा वापर करून डेटा गोळा केला, यावरही सरकारने आक्षेप घेतला आहे. तसेच याबाबत भारत सरकारने नुकताच CSR अहवाल प्रसिद्ध केला आहे.


डब्ल्यूएचओच्या अहवालाबाबत बोलायचे झाले तर, त्यानुसार गेल्या दोन वर्षांत 1.5 कोटी लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे किंवा वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला आहे, असे या अहवालात सांगण्यात आले आहे. तसेच भारताचा आकडा 47 लाखांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस अधानोम (Tedros Adhanom ) यांनी म्हटले आहे की, ही अत्यंत गंभीर आकडेवारी आहे. भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व देशांनी अधिक तयारी करावी आणि या दिशेने अधिक गुंतवणुकीवरही भर दिला पाहिजे, असं ते म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: