Mumbai Monsoon Update:  मान्सून केरळात (Monsoon Keralal) दाखल झाला असला तरी महाराष्ट्रात त्याचं कधी आगमन होईल, याबाबत अनिश्चितता आहे.  तरीही 15 ते 17 जूनच्या दरम्यान मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री होऊ शकते, असा अंदाज आहे. मान्सून  केरळात दाखल झाला की  मुंबईमध्ये कधी येणार असे वाक्य दरवर्षी आपल्या कानावर पडते. या ही वर्षी मान्सून रखडणार उशीरा दाखल होणार अशी माहिती समोर येत आहे. तसा आत्तापर्यंतचा मुंबईतील मान्सूनचा इतिहास पाहिला तर मान्सूनचे आगमन मुंबईत कधीच वेळेत झाले नाही. गेल्या दोन दशकातील मान्सून आगमनाच्या तारखा पाहिल्या तर मुंबईत मान्सून हा सरासरी 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होतो. 

केरळात मान्सून (K दाखल झाल्यानंतर  कधी  चक्रीवदळचा (Cyclone) अडथळा तर कधी  कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सून रखडतो. हे सगळे पार झाल्यानंतर मान्सून जरी कोकणात दाखल झाला तरी मुंबईकरांना मात्र वाट पाहावी लागते.त्यामुळे मुंबईत मान्सून हा आतापर्यंत कधीच जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल झालेला नाही. गेल्या 20 वर्षातील मुंबईतील मान्सून  आगमनच्या तारखावर नजर मारल्यास मान्सून हा 2006 साली सर्वात लवकर म्हणजे 31 मे रोजी दाखल झाला होता. सर्वात उशीरा मान्सून 2019 साली  26 जून रोजी दाखल झाला आहे.  

 केरळ आणि मुंबईत दाखल झालेला मान्सूनच्या तारखा 

वर्षकेरळमुंबई
200123 मे9 जून
200229 मे12 जून
20038 जून16 जून
200418 मे10 जून
20055 जून19 जून
200626 मे31 मे
200728 मे18 जून
200831 मे7 जून
200923 मे21 जून
201031 मे11 जून
201129 मे5 जून
20125 जून17 जून
20131 जून8 जून
20146 जून12 जून
20155 जून8 जून
20168 जून20 जून
201730 मे10 जून
201829 मे9 जून
20198 जून25 जून
20201 जून25 जून
20213 जून9 जून
202229 मे11 जून
20238 जूनअद्याप आलेला नाही

पावसाचा प्रवास कधी अंदमान, कधी केरळ असा रेंगाळतो तर कधी पश्चिम किनारपट्टीवरून पुढे सरकणारी पावसाची शाखा रखडते.  दरम्यान पूर्व किनारपट्टीवरून कधी पाऊस त्याचा  प्रवास सुरू ठेवतो आणि आंध्र - विदर्भातून  राज्यात  दाखल होतो.  मुंबई मात्र मान्सूनची कायमच प्रतीक्षा करते. 

उन्हाच्या तडाख्यापासून सुटका मिळण्याची वाट पाहत आहेत. एकीकडे केरळमध्ये पाऊस पोहोचला आहे. पण, मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

हे ही वाचा:

Monsoon 2023: आनंदवार्ता... मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती