मुंबई  : मध्य रेल्वेवर 13 मार्चला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक परीचालीत करणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठाणे- कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 8.16 ते सायंकाळी 4.17 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान थांबणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील.  या सेवा त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
 
कल्याण येथून सकाळी 8. 40 ते सायंकाळी 4.58  पर्यंत  सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.  या सेवा त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.  


 कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत
 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.54 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 
तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.


 हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.


पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे


संबंधित बातम्या :



Noise pollution : मुंबईत रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत बांधकाम बंद, पोलीस आयुक्तांचे आदेश