Mumbai Corona Update :  मुंबईतील कोरोनारुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून आटोक्यात आली असून मृतांची आकडेवारीही कमी झाली आहे. विशेष म्हणजे मार्च महिना सुरू झाल्यापासून 6 मार्चचा अपवाद वगळता दररोज शून्य मृत्यूची नोंद होत आहे. मार्च महिन्याच्या 11 दिवसांपैकी 10 दिवस शून्य मृत्यूची नोंद झाल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 54 कोरोनाबाधित आढळले असून 78 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  कोविदची तिसरी लाट सुरू झाल्यापासून मुंबईत 20 वेळा शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. मुंबईत कमी आढळणाऱ्या रुग्णांमुळे कोरोना रुग्ण दुपटीचा दरही वाढत आहे. आज हा दर थेट 9 हजार पार गेला असून 10762 दिवसांवर पोहोचला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 381 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 54 रुग्णांपैकी 4 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 509  बेड्सपैकी केवळ 192 बेड वापरात आहेत.


महिनानिहाय मृतांची आकडेवारी


जानेवारी - एक दिवस शून्य मृत्यू


फेब्रुवारी - नऊ दिवस शून्य मृत्यू


मार्च - आतापर्यंत 10 दिवस शून्य मृत्यू


राज्यात 318 नवे कोरोनाबाधित 


राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज राज्यात 318 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 355  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज एका  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,19,  949  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.09 टक्के झाले आहे.  सध्या राज्यात  18, 633 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 566  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7, 85, 28, 186   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


हे ही वाचा -



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha