Mumbai Noise pollution : ध्वनी प्रदूषणाला आपण गंभीरतेने घेत नाही, मात्र हे प्रदूषण अदृश्य असून जीवघेणे आहे. ध्वनी प्रदूषणामुळे अनेकांना त्रास होतो. वयोवृद्धासह लहानग्यांनाही या त्रासामुळे अनेक आजारांना समारं जावे लागते. मुंबईत तर मागील काही दिवसांपासून ध्वनी प्रदूषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. याचं मुख्य कारण, रात्रीच्या काळात होणारे बांधकाम आहे. बांधकामावेळी विविध प्रकाराच्या आवाजामुळे त्रास होतो. लहान मुले आणि वयोवृद्धांना याचा जास्त त्रास होतो. याच्या मुंबई पोलिसांकडे गेल्या काही दिवसांपासून अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईमधील बांधकाम रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंद करण्याचा आदेश दिला आहे. मुंबईतील   ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.


वाढत्या ध्वनिप्रदूषणामुळे मुंबईतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच्या तक्रारींची गरज पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतली. त्या दृष्टीने पावले उचललत संजय पांडे यांनी बांधकाम, व्यावसायिक यांच्याशी बैठक घेतली. त्यानुसार बांधकाम व्यावसायिक आणि कामगारांना रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान बांधकाम करण्यास बंदी असणार आहे. मुंबईतील रात्रीचे बांधकाम बंद करण्याचा निर्णय घेतानाच पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विकसकांना काही सूचनाही केल्या आहेत. बांधकाम स्थळी आवाज रोखणारे अडथळे बसवा. आवाजाची पातळी डेसिबल मयदिपेक्षा जास्त नको. रक्षक मुख्य रस्त्यांवरच न ठेवता केवळ बांधकामाच्या ठिकाणी तैनात करावा. आवाजाची पातळी फक्त 65 डेसिबलच्या खाली असावी.


पोलीस आयुक्तपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर संजय पांडे यांनी नागरिकांशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर येणाऱ्या नागरिकांच्या तक्रारीकडे पांडे यांनी लक्ष वेधत, सोडवण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी येत होत्या. बांधकामाच्या वेळी मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी व्यथा फेसबुक लाईव्हमध्ये काही नागरिकांनी मांडली होती. याची दखल घेत पांडे यांनी हा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई शहरातील काही नामांकित बांधकाम व्यावसायिकांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी मुंबईत रात्रीच्या बांधकामावर बंदीचा निर्णय जाहीर केला.