Mumbai Coronavirus Cases : मुंबईत वर्षाच्य़ा सुरुवातीला कोरोना रुग्णांसंख्येचा स्फोट झाला होता. पण आता हळूहळू कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत घट होत असून आज नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या एक हजारांखाली गेली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आजही दुप्पटचं आहे. सोमवारी मुंबईत नवे 960 कोरोनाबाधित आढळले असून 1 हजार 837 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 9 हजार 900 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सोमवारी 960 नवे रुग्ण आढळले असून 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 623 झाली आहे. तर मागील 24 तासांत 1 हजार 837 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.
मुंबईतील कोरोनारुग्ण संख्येच्या आकडेवारीवर एक नजर..
दिनांक | मुंबईतील रुग्णसंख्या |
15 जानेवारी | 10, 661 |
16 जानेवारी | 7, 895 |
17 जानेवारी | 5, 956 |
18 जानेवारी | 6, 149 |
19 जानेवारी | 6, 032 |
20 जानेवारी | 5,708 |
21 जानेवारी | 5,008 |
22 जानेवारी | 3,568 |
23 जानेवारी | 2,250 |
24 जानेवारी | 1,857 |
25 जानेवारी | 1,815 |
26 जानेवारी | 1,858 |
27 जानेवारी | 1,384 |
28 जानेवारी | 1,312 |
29 जानेवारी | 1,411 |
30 जानेवारी | 1,160 |
31 जानेवारी | 960 |
सध्या मुंबईतील 6 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 960 रुग्णांपैकी 106 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 37 हजार 576 बेड्सपैकी केवळ 2 हजार 215 बेड वापरात आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron in Kids : काळजी घ्या! चिमुकल्यांना ओमायक्रॉनचा अधिक धोका, लागण झालेल्या मुलांमध्ये 'ही' पाच लक्षणे
- India Corona Vaccination : लसीकरणाचा आणखी एक महत्वाचा टप्पा पार, 75 टक्के प्रौढ व्यक्तींचे लसीकरण पूर्ण
- भामहाराष्ट्रात मास्कमुक्ती शक्य आहे की नाही?, टास्क फोर्सने एका वाक्यात सांगितलं!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha