Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना महामारीने हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे. तीन दिवसांपासून दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.  कोरोनाच्या आकडेवारीत आज (शुक्रवारी ) कमालीची वाढ होताना दिसत आहे. आज थेट   5 हजार 631 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. गुरूवारच्या (30 डिसेंबर) तुलनेत ही आकडेवारी कमालीची वाढलेली आहे. गुरूवारी समोर आलेली आकडेवारी 3671 होती. ज्यामध्ये मोठी वाढ होऊन आज 5 हजार 631 रुग्ण समोर आले आहेत.  कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कोरोना फोफावतोय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मागील आठवड्याभरात झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी

30 डिसेंबर -   5631  रुग्ण29 डिसेंबर - 2510 रुग्ण 28 डिसेंबर – 1377 रूग्ण 27 डिसेंबर – 809 रूग्ण   26 डिसेंबर – 922 रूग्ण   25 डिसेंबर – 757 रूग्ण   24 डिसेंबर – 683 रूग्ण

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुंबईमध्ये 5631 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत 497 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज एका रुग्णाचा कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय. मुंबईत आतापर्यंत सात लाख 49 हजार 707 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  

मुंबईचा कोरोनामुक्त रुग्णांचा दर 95 टक्के इतका आहे. मुंबईत 16  हजार 441 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईचा कोरोना दुपटीचा दर 360 दिवस इतका झालाय. 24 डिसेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान मुंबईतील कोरोना रुग्णाचा दर 0.20 टक्के इतका झालाय.  मुंबईत 11 कंटेनमेंट झोन आहे.  मुंबईत सध्या सील केलेल्या इमारतींची संख्या 128 आहेत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा आकडा वाढला, शुक्रवारी 8067 कोरोनाबाधितांची नोंद

उदयपूरमध्ये ओमायक्रॉनबाधित रुग्णाचा मृत्यू, 14 डिसेंबरला झाली होती लागण