Mumbai Coronavirus Cases : मुंबईमध्ये कोरोना महामारीने (Corona) पुन्हा एकदा हाहाकार माजवला असताना पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेत सापडलेल्या एका दिवसातील रुग्णांपेक्षाही अधिक रुग्ण सापडत आहेत. तब्बल 20 हजारांच्या घऱात रुग्ण संख्या गेल्यानंतर आज मात्र काहीशा कमी प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. मागील 24 तासांत 13 हजार 648 कोरोनाबाधित समोर आले असून 5 जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. दररोज 19 ते 20 हजारांमध्ये आढळणारे रुग्ण आज 13 हजार 648 सापडल्याने नागरिकांसह प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी तब्बल 27 हजार 214 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केल्याने नव्या आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. ही देखील एख दिलासादायक गोष्ट आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 411... झाली आहे. सध्या मुंबईत 1 लाख 3 हजार 862 सक्रीय रुग्ण आहेत.
मुंबईतील रुग्णसंख्येची आकडेवारी
तारीख | मुंबईतील रुग्णसंख्या |
21 डिसेंबर | 327 |
22 डिसेंबर | 490 |
23 डिसेंबर | 602 |
24 डिसेंबर | 683 |
25 डिसेंबर | 757 |
26 डिसेंबर | 922 |
27 डिसेंबर | 809 |
28 डिसेंबर | 1377 |
29 डिसेंबर | 2510 |
30 डिसेंबर | 3671 |
1 जानेवारी | 6347 |
2 जानेवारी | 8063 |
3 जानेवारी | 8082 |
4 जानेवारी | 10860 |
5 जानेवारी | 15166 |
6 जानेवारी | 20181 |
7 जानेवारी | 20971 |
8 जानेवारी | 20,318 |
9 जानेवारी | 19474 |
10 जानेवारी | 13,648 |
महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai Corona : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या खरंच स्थिर झाली आहे का?
- Booster Dose : आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांना 'बूस्टर'
- Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना संसर्गवाढीचा आलेख वाढताच; रविवारी 44 हजार 388 रुग्णांची नोंद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha