Mhada Lottery in Mumbai : मुंबईत हक्काचं घरं असणं अनेकांचं स्वप्न असतं. पण वाढणाऱ्या घरांच्या किंमती पाहता अनेकांना हे शक्य नसतं, दरम्यान अशा सर्वांसाठी म्हाडा लॉटरी पद्धतीने बाजारभावापेक्षा कमी किंमतीत घरं उपलब्ध करुन देत असते. ज्यामध्ये प्रत्येकजण अर्ज करु शकतो आणि ज्याचंही नाव लॉटरीत निघेल त्याला कमी किंमतीत हक्काचं अधिकृत घर मुंबईत घेता येतं. दरम्यान ठरावीक काळानंतर विविध ठिकाणी ही घरं उपलब्ध होत असून आता म्हाडा नवीन 3 हजार 15 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. 2023 च्या सुरुवातीला ही लॉटरी निघेल. मुंबईतील महत्त्वाचं ठिकाण असणाऱ्या गोरेगाव येथील पहाडी याठिकाणी संबधित घरं असून त्यांचं 70 टक्के पूर्ण झालं आहे. बांधकमा मंत्री जिंतेद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
कोणासाठी किती घरं?
एकूण 3 हजार 15 घरांपैकी दुर्बल घटकांसाठी 1 हजार 947 घरे राखीव आहेत. तर उर्वरीत घरांमधील अल्प उत्पन्न गटासाठी 736, मध्यम उत्पन्न गटासाठी 227 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 105 घरे उपलब्ध आहेत. 25 लाख किंमतीच्या आतमध्ये वन रुम किचन इतक्या आकाराचे घर या प्रकल्पात घेता येणार आहे.
'सामान्यांच्या घराचा प्रश्न सोडवणार'
यासारखेच आणखी प्रकल्प MMR क्षेत्रात मोठ्या प्रमाणात करण्याचा म्हाडाचा विचार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं. तसंच पुण्यालाही 100 एकर जागा घेतली असून ठाण्यातही घरे बांधली जात आहेत. तसंच सातारा, सोलापूर, सांगली, मिरज जिथे जिथे म्हाडाच्या जागा आहे तिथे इमारती बांधून लोकांच्या घराचा प्रश्न सोडवला जाईल आणि म्हाडाच्या घरांचा दर खाजगी बिल्डरांपेक्षा 60 टक्के कमी असेल असंही आव्हाड म्हणाले.
'मुंबईचा संपूर्ण विकास करणार'
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी आणखी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी मुंबईत एक हजार मुला-मुलींसाठी वसतीगृह बांधणार असून याठिकाणी ग्रंथालय, जिम, खेळण्यासाठी कोर्ट असेल अशी सुविधा असणार असल्याचं ते म्हणाले. तसेच पत्रा चाळ प्रकल्पही मार्गी लागत असून 26 जानेवारीला मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाईल असं आव्हाड यांनी सांगितलं. तसंच म्हाडाच्या 56 वसाहतींचा विकास करणार असून टागोर नगर, अभ्युदय नगर अशा अनेक ठिकाणी मोठ्या वसाहती असून त्यांचा विकास करणार असल्याचं आव्हाड म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- Mumbai : मुंबईत 22 लाखांत मिळणार 1 BHK; जुलै महिन्यांत म्हाडा काढणार 4 हजार घरांची लॉटरी
- Mumbai Corona : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या खरंच स्थिर झाली आहे का?
- Booster Dose : आजपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांना 'बूस्टर'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha