Mumbai Coronavirus Cases : मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णाची संख्या काहीशी स्थिरावताना दिसत आहे. मागील काही दिवसांत प्रचंड प्रमाणात सापडणारे रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत असल्याने प्रशासनासह नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. आज (शुक्रवारी) सापडलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जवळपास दुप्पट असल्याचेही समोर आले आहे. मागील 24 तासांत 11 हजार 318 नवे कोरोनाबाधित सापडले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. पण रुग्णसंख्या 10 हजारांहून अधिक असल्याने धोका कायम आहे. ज्यामुळे योग्य काळजी घेऊन नियम पाळणं महत्त्वाचं झालं आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत गुरुवारी 22 हजार 73 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट एका टक्क्याने वाढून 89 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच मागील 24 तासांत 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 435 झाली आहे. कोरोनारुग्णांच्या मागील काही दिवसातील आकडेवारीवर एक नजर..
मुंबईतील रुग्णसंख्येची आकडेवारी -
तारीख | मुंबईतील रुग्णसंख्या |
24 डिसेंबर | 683 |
25 डिसेंबर | 757 |
26 डिसेंबर | 922 |
27 डिसेंबर | 809 |
28 डिसेंबर | 1377 |
29 डिसेंबर | 2510 |
30 डिसेंबर | 3671 |
1 जानेवारी | 6347 |
2 जानेवारी | 8063 |
3 जानेवारी | 8082 |
4 जानेवारी | 10860 |
5 जानेवारी | 15166 |
6 जानेवारी | 20181 |
7 जानेवारी | 20971 |
8 जानेवारी | 20,318 |
9 जानेवारी | 19474 |
10 जानेवारी | 13,648 |
11 जानेवारी | 11,647 |
12 जानेवारी | 16,420 |
13 जानेवारी | 13, 702 |
14 जानेवारी | 11, 317 |
संबंधित बातम्या
- कोव्हिड सेल्फ टेस्टिंगबाबत मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी, लपवाछपवी रोखण्यासाठी पालिकेची नियमावली
- मुंबईतील रोजच्या कोरोना रुग्ण संख्या चढ-उताराचा निष्कर्ष नेमका काय काढायचा?
- कोरोना निर्बंधाचा विमानसेवेला फटका, औरंगाबादमध्ये गेल्या पंधरा दिवसात 33 विमानांचे उड्डाण रद्द
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha