Mumbai coronavirus  cases : मुंबईतील रुग्णसंख्या मागील तीन दिवसांपासून स्थिर किंवा काही प्रमाणात कमी झालेली दिसत होती. बुधावरी पुन्हा एकदा मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे मुंबईत कोरोना रुग्ण संख्या कमी व्हायला लागली, स्थिर झाली असे दावे केले जात आहेत. अशातच अद्याप मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरवली नसल्याचं तज्ज्ञाचे म्हणणं आहे. रुग्णसंख्येत अजून काही दिवस असाच चढ उतार पाहायला मिळणार आहे. मुंबईतील रुग्ण संख्याच्या बाबतीत सद्यस्थितीत कुठल्या निष्कर्षाला पोहोचणे चुकीचे ठरेल, असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे.  मुंबईतील रोजच्या कोरोना रुग्ण संख्या चढ-उताराचा निष्कर्ष नेमका काय काढायचा ? यावरील रिपोर्ट पाहूयात...

4 जानेवारी - मुंबईत नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण 15604  5 जानेवारी - मुंबईत नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण 208536 जानेवारी - मुंबईत नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण 220737 जानेवारी - मुंबईत नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण 214808 जानेवारी - मुंबईत नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण 210299 जानेवारी - मुंबईत नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण -1555110 जानेवारी - मुंबईत नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण-1281011 जानेवारी - मुंबईत नव्याने आढळलेले कोरोना रुग्ण 1164712 जानेवारीला अचानक रुग्ण संख्या वाढवली ती 16420

या सगळ्या आकडेवारीकडे पाहिल्यानंतर  मुंबईत 1 ते 7 जानेवारी दरम्यान झपाट्याने आकडेवारी वाढलेली पाहायला मिळतीये..त्यानंतर 8 ते 11 जानेवारी दरम्यान  कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी व्हायला लागल्याने. मुंबईत कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असे निष्कर्ष काढले जाऊ लागले. मात्र 12 जानेवारीला रुग्ण संख्या मध्ये 40 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याचं समोर आल्यानंतर मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या याबाबत कुठलाही निष्कर्ष सद्यस्थितीत काढणे चुकीचे ठरेल, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले.  कोरोना चाचण्यांचे कमीअधिक प्रमाणामुळे रुग्ण संख्येत चढ-उतार होत असल्याचं मत काही डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. रुग्ण संख्येमध्ये सलग पाच ते सहा दिवस कमी झाल्याचे चित्र दिसले तर आपल्याला मुंबईच्या रुग्णसंख्या बाबत एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. मात्र सद्यस्थितीत निष्कर्ष काढणे कठीण असून तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेतली शिवाय पर्याय नाहीये. 

कोरोना चाचणी करण्यासंदर्भात आईसीएमआरने नवीन गाईडलाईन जारी केल्यानंतर लक्षण असलेल्या रुग्णांच्या चाचण्या कराव्यात असा निर्णय घेण्यात आलाय..त्यामुळे मुंबईतील पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याचं मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोरोना चाचण्या नुसार मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या मध्ये आणखी काही दिवस अशाच प्रकारचा चढ-उतार पाहायला मिळेल असं सध्या तरी चित्र सांगताय. त्यामुळे सध्या तरी मुंबईची कोरोना रुग्णसंख्या स्थिर किंवा कमी होत जाते असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार आहे. कारण आणखी काही दिवस आपल्याला या रुग्णसंख्या चढ-उतार पाहायला मिळेल. जर सलग पाच-सात दिवस रुग्ण संख्या कमी होत चालली आहे, असंच चित्र दिसेल तेव्हाच रुग्ण संख्या कमी झाली आहे, असा निष्कर्ष काढता येईल आणि त्यानुसार निर्बंध शिथिल करण्याबाबत सुद्धा प्रशासनाकडून विचार केला जाईल. मात्र, तोपर्यंत तिसऱ्या लाटेपासून स्वतःचा बचाव करणे आणि खबरदारी घ्यायला विसरू नका.