मुंबईतील वरळी इथं ओबीसी महासंघाचं महाअधिवेशन पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्च 2018 मध्ये लोकसभेत ही मागणी केली होती. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली होती.
शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 2015 मध्येच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं.
भारतरत्न
1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर भारतरत्न कोणालाही जाहीर झालेला नाही.
संबंधित बातम्या
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न' द्या: सुप्रिया सुळे
राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या: खा. महाडिक