मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढणारी संख्या पाहता राज्य शासनाच्या आणि टास्क फोर्सच्या बैठकींची सत्र सुरु आहेत. यातच राज्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लावला जाण्याची चिन्हं जवळपास स्पष्ट झाली आहेत. पण, हा लॉकडाऊन नेमका कसा असेल याबाबतची माहिती मात्र समोर आलेली नाही. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यात सध्याच्या घडीला सेमी लॉकडाऊनची परिस्थिती असल्याचं लक्षवेधी वक्तव्य केलं. त्यामुळं येत्या काळात कडक लॉकडाऊन लागणार, की राज्य शासनाकडून सेमी लॉकडाऊनची नियमावली जाहीर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


राज्यात केंद्रीय पथकांच्या आढाव्यानंतर देण्यात आलेल्या सुचनांची अंमलबजावणी राज्य शासनाकडून सुरु असल्याचं म्हणत जवळपास 80 टक्के आरटीपीसीआर चाचण्या होत असल्याचं ते म्हणाले. राज्यात दिवसाला 63 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळू लागल्यामुळं आरोग्य सेवेत सुधारणा करण्याचा निर्णय़ घेण्यात आल्याचं म्हणत बेड्स, ऑक्सीजन पुरवठा याची व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि महापालिका अधिकार्‍यांना देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 


Sharad Pawar Health : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती


येत्या काळात राज्यातील परिस्थिती नेमकी कशी असेल याबाबत सांगताना पुढल सर्व निर्णय हे परिस्थिती पाहून मंत्रीमंडळाच्या बैठकीत होती असंही ते म्हणाले. विरोधी पक्षांकडून सातत्यानं हातावर पोट असणाऱ्यांच्या आणि गरजूंच्या खात्यात लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी पैसे देऊ करावेत अशी मागणी केली जात आहे. त्यावर उत्तर देताना मलिक म्हणाले, 'भाजपचे लोक पैसे द्या म्हणत आहेत, राजकारण करत आहेत. पण, हे योग्य नाही. पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन लावत असताना कुणाच्या खात्यात पैसे टाकले नव्हते. विरोधक राजकारण खेळत आहेत'. 


इतर राज्यांमध्ये ज्याप्रमाणं आर्थिक मदतीचा ओघ गरजवंतांपर्यंत पोहोचला तसंच चित्र महाराष्ट्रातही होतं. मजुरांना जवळपास 4 महिने रोज दोन वेळचं देवणंहगी देण्यात आलं होतं, असं म्हणत राज्य शासनावर आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये काय परिस्थिती आहे यावर एकदा नजर टाकावी असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.