Maharashtra Corona Update : राज्यात एकीकडे निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे तर दुसरीकडे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेकडे सुद्धा टास्क फोर्सचे बारीक लक्ष आहे.  राज्यामध्ये जर ऑक्सिजन पुन्हा मोठ्या प्रमाणावर लागला म्हणजे जवळपास राज्यात 700 मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासली आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वरील रुग्ण हे तीस हजारापेक्षा अधिक झाले तर तेव्हा निर्बंध लावावे लागणं हे अपरिहार्य असेल, अशी माहिती राज्याचे कोविड टास्क कोर्स प्रमुख डॉ संजय ओक यांनी दिली आहे. 



डॉ संजय ओक म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे आणि त्यात तिसऱ्या लाटेची शक्यता विसरून चालणार नाही. यामध्ये आर्थिक चक्राला गती देण्यासाठी, सर्वसामान्यांचं जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी समतोल आणि समन्वय मध्य साधण्याची गरज होती.  म्हणून टास्क फोर्सने अनेक बैठका घेऊन शासनाला निर्बंध कसे शिथिल करता येतील यबाबत सूचना केल्या होत्या.  त्यानुसार दुकाने, मॉल्स, जिम खुली करण्यात आली आहेत मात्र हे निर्बंध शिथिल करत असताना शासनाने समाजाकडून काही अपेक्षा ठेवल्या आहेत. मास्क सोशल डिस्टंसिंग, जिथे-जिथे वर फ्रॉम शक्य आहे या प्रणालीचा वापर करणं, कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवणे, क्यू आर कोड आयडी कार्ड असलेल्या व्यक्तींना लोकलमध्ये प्रवेश देणे या सर्व बाबींचा अंतर्भाव आहे, असं त्यांनी सांगितलं. 


त्यामुळे एकीकडे निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे तर दुसरीकडे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या शक्यतेकडे सुद्धा टास्क फोर्सचे बारीक लक्ष आहे. राज्यामध्ये जर ऑक्सिजन पुन्हा मोठ्या प्रमाणावर लागला म्हणजे जवळपास राज्यात 700 मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजन ची गरज भासली आणि ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड वरील रुग्ण हे तीस हजारापेक्षा अधिक झाले तर तेव्हा निर्बंध लावावे लागणं हे अपरिहार्य असेल, असं ओक यांनी सांगितलं. 


डेल्टा प्लसच्या गंभीर परिणामांकडे विशेषत्वाने कडे लक्ष देण्याची गरज
डॉ संजय ओक यांनी सांगितलं की,  राज्यात डेल्टा व्हेरिएंटची होणारी वाढ हा फारसा चिंतेचा विषय जरी नसला तरी निरीक्षणाचा विषय आहे. दुसऱ्या लाटेत  आपण मोठ्या प्रमाणावर डेल्टा व्हेरिएंटला सामोरे गेलो आहोत. त्यामुळे काही प्रमाणात सामुदायिक प्रतिकारशक्ती आपल्यामध्ये आहे.  मात्र, डेल्टा प्लस हे त्याचं अपत्य समोर आलेला आहे त्याच्या गंभीर परिणामांकडे विशेषत्वाने कडे लक्ष देण्याची गरज आहे.ते रोखण्यासाठी विविध उपाय शासन राबवत आहे. दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य आहे. कारण कोरोना प्रतिबंधक लस ही  डेल्टा व्हेरिएंट येण्याआधी तयार झालेली आहे. जशी विषाणू मध्ये उत्क्रांती होते तशी लशी मध्ये सुद्धा फरक घडत जातात. त्यामुळे दोन डोस घेतले त्यांना डेल्टाचा संसर्ग होणार नाही अशातला भाग नाही किंवा असं कोणी समजू नये, असं त्यांनी सांगितलं.  मात्र, ज्यांनी लसीकरण पूर्ण केलाय त्यांच्यात डेल्टाची दाहकता परिणामकारकता निश्चित कमी असेल, असंही ते म्हणाले. 


डॉ ओक म्हणाले की, राज्य शाळा सुरु करण्याबाबत विविध मतप्रवाह आहेत टास्क फोर्स याबाबत विचारपूर्वक पावले टाकत आहे. याला काही कारणं आहेत ज्यामध्ये लहान मुलांना द्यायची लस अजूनही उपलब्ध नाही ...ज्या लहान मुलांना आपण लस दिली आहेत त्याचे परिणाम सप्टेंबरच्या मध्यामध्ये कळतील. सध्या कोरोना विषाणूची इनफेक्टिविटी,, त्याची दाहकता अधिक असल्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत आपण संथ गतीने पावले टाकतोय. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस चित्र आणखी स्पष्ट होईल त्यावेळी शाळे बाबत आपण सकारात्मक विचार करू शकू, असं डॉ ओक म्हणाले.