मुंबई: मुंबईतल्या घराचा मोह कोणाला नसतो त्यात शासकीय निवास स्थान असेल तर बात काही औरच … असंच काहीसं झालंय बड्या अधिकाऱ्यांचं. जवळपास 87 अधिकाऱ्यांनी बदली आणि सेवानिवृत्त झाल्यावर मुंबईत घर कायम ठेवली होती पण त्यांना हे प्रकरण चांगलंच महागात पडणार आहे. बदली किंवा सेवानिवृत्त झाल्यावर घरं कायम ठेऊन बड्या अधिका-यांनी घराचं लाखो रुपयाचं भाडं थकवल्याचं समोर आलं आहे या सगळ्या अधिकाऱ्यांना आता शासनानं दणका देण्याचं ठरवलं आहे अधिकाऱ्यांची दंडनीय रक्कम देखील लाखोंच्या घरात आहेत. जवळपास 87 अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतनातून किंवा वेतनातून ही भाडेवसूली करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने 87 अधिकाऱ्यांची यादी आणि त्यांच्याकडून अपेक्षित घरभाड्याची रक्कम याचे तपशील दिले असून, त्यात आयएएस-आयपीएस अधिकारी, विविध विभागांतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 


बदली झाल्यानंतर किंवा सेवानिवृत्तीनंतरही बरेच सरकारी अधिकारी त्यांना दिलेल्या निवासस्थानातच राहतात. तर काही जणांनी ती बराच काळ वापरून मग सोडली, तर काही जणांनी ती अद्याप सोडलेली नाहीत. यामुळे बाहेरून मुंबईत बदली होऊन आलेल्या अनेकांना सरकारी निवासस्थानांसाठी खोळंबून राहावे लागते. त्यामुळे मुदतीनंतरही सरकारी निवासस्थान न सोडणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या निवृत्तिवेतनातून, तर बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या वेतनातून घरभाडे वसूल करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


कोण कोण आहेत हे अधिकारी ?


नाव                                             रक्कम 


राजेश नार्वेकर                    60 लाख 74 हजार 737 रुपये


डॅा उषा यादव                     30 लाख 93 हजार 300 रुपये 


सुरेश पेडगांवकर               21 लाख 34 हजार 760 रुपये 


अमिताभ गुप्ता                   15 लाख 88 हजार 155 रुपये 


ज्योती भोसले                   18 लाख 79 हजार 500 रुपये 


अतिश सोनी                      14 लाख 7 हजार 259 रुपये 


के पी बक्षी                        13 लाख 24 हजार 607 रुपये 


प्रशांत साळी                    १२ लाख ५० हजार ५०८ रुपये 


दिलीप शिंदे                      11 लाख 15 हजार 100 रुपये 


श्रीकांत सिंह                      10 लाख 97 हजार 185 रुपये 


मोहम्मद अक्रम सहिद        8 लाख 41 हजार 212 रुपये 


केशव इरप्पा                     9 लाख 41 हजार 26 रुपये 


सुनिल सोव्हितकर             2 लाख 48 हजार 735 रुपये 


शिरिष मोरे                        2 लाख 13 हजार 735 रुपये 


सुधीर श्रीवास्तव                 1 लाख 58 हजार 375 रुपये 



सेवानिवृत्ती-बदलीनंतरही अधिकारी घर सोडेनात, सरकारला घ्यावा लागला हा निर्णय 


सेवानिवृत्ती आणि बदलीनंतरही अनेक अधिकारी सरकारची घर सोडताना दिसत नाही. ते सरकारी घरातच राहत असतात अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाने दणका दिला असून, या अधिकाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून भाडेवसुली करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. जवळपास 87 अधिकाऱ्यांच्या निवृत्तीवेतनातून किंवा वेतनातून ही भाडेवसुली करण्यात येणार आहे. 


सामान्य प्रशासन विभागाने 87 अधिकाऱ्यांची यादी आणि त्यांच्याकडून अपेक्षित घरभाड्याची रक्कम याचे तपशील दिले असून, त्यात आयएएस-आयपीएस अधिकारी, विविध विभागांतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी अनेक अधिकाऱ्यांनी यापूर्वीच घर सोडले असले तरी सेवानिवृत्ती-बदलीनंतर ताब्यात ठेवलेला कालावधी हा घरभाडे वसुलीची रक्कम निश्चित करण्यासाठी मोजण्यात आला आहे. दरम्यान घर ताब्यात असेपर्यंतच्या कालावधीचे घरभाडे त्यांच्या निवृत्तिवेतनातून वा वेतनातून वसूल करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने कोषागार कार्यालयाला पत्र पाठवले आहे