मुंबई : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने भाजपचे माजी आमदार मितेश भांगडीया यांची पासपोर्ट प्रकणावरुन मंत्री वडेट्टीवार यांच्या विरोधातील याचिक फेटाळली आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपलं नाव चर्चेत असल्यामुळे आपलं पासपोर्ट प्रकरण टायमिंग साधत काढण्यात आलं, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.


काय आहे प्रकरण?
मंत्री वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. नंतर कारवाई झाली नाही तेव्हा ते हायकोर्टात गेले. माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा पर्मनंट अॅड्रेस दिला होता. तिथल्या पोलीस स्टेशनमधून एनओसी घेतली होती. त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत. त्यामुळं भांगडिया कोर्टात गेले. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे.


Exclusive | प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असल्यानं पासपोर्ट प्रकरण उकरुन टायमिंग साधलं : विजय वडेट्टीवार


माझ्या विरोधातील षडयंत्र : मंत्री वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "पासपोर्ट प्रकरण उकरुन काढणं म्हणजे, किरकोळ आहे. त्यात एवढं काही नाही. राजकारणात बदनामीच षडयंत्र करणं सुरुच असतं. त्यामध्ये एवढा मोठा विषय नाही. पण टायमिंग साधला गेलाय. शेवटी राजकारण आहे, राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपण कोणावर आरोप करण्यापेक्षा आपल्या हातून काय चुका झाल्यात त्यावर चर्चा करुन चुका होऊ नयेत म्हणून पुढे जाणं हा राजकारणातील गुणधर्म आहे."


Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र?