मुंबई : राज्य सध्या कोरोनाची लढाई लढत असताना दुसरीकडे राजकीय खलबतंही जोरदार होऊ लागली आहेत.  काँग्रेसने विधानसभा आणि स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार येऊन 1 वर्ष सात महिने झाले असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. इतकंच नाही तर हायकमांडने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर स्वीकारेन असंही सूतोवाच केलं.


नुकताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करणारा व्हिडीओ व्हायरल झाला त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच वर्षे मुख्यमंत्री असतील. काँग्रेसमुळे सरकार अडचणीत येणार नाही असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. 


शिवसेना-राष्ट्रवादीची जवळीक काँग्रेसला सलतेय? महाविकासआघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार?


नुकताच शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या बावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त महाविकास आघाडी सरकार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. पण शरद पवार यांनी आपल्या पक्षाबाबत भूमिका मांडली मी माझ्या पक्षबाबत भूमिका मांडली असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.


"आम्हाला सोबत राहून पाठीत सुरा खुपसायची सवय नाही, काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढणार" : नाना पटोले


विधानसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवल्यास भाजपला मदत होईल का? याबाबत नाना पटोले यांनी पंढरपूर पोटनिवडणुकीत काय झालं बघितलं असा उपहासात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.


मित्रपक्षांचं काही माहित नाही पण आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले


जनभावना काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी आहे आणि काँग्रेस 2024 मध्ये राज्यात एक क्रमांकाचा पक्ष असेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. एकूणच सरकार पाच वर्षे पूर्ण करण्याआधीच महाविकास आघाडीत काँग्रेसने स्वबळाचा नारा देत मुख्यमंत्री पदाबाबत दावा केला आहे.


काय म्हणाले होते नाना पटोले


बुलडाण्यात बोलताना नाना पटोले म्हणाले होते की, "ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढेल. ते आमचे मित्र पक्ष आहेत आणि मित्र पक्षांचं प्लानिंग वेगळं असेल, आम्ही काँग्रेस म्हणून आमची तयारी सुरू केलीय. विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी सुरु झालेली आहे. राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळे बसून काय निर्णय होईल ते बघू. परंतु आज आमच्या समोर त्यांचा कुठला प्रस्ताव नाही."