मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त (MAHAPARINIRVAN DIN) दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायींची मोठी गर्दी होत आहे. दादरच्या चैत्यभूमीवरील प्रेक्षक गॅलरी अर्थात व्युइंग गॅलरी स्वच्छ नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) संतापले. गॅलरी अस्वच्छ असल्याने अजित पवारांनी थेट मुंबई महापालिका आयुक्ता इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना या संदर्भात फोन करून विचारणा केली. तर गार्डनमधील निकृष्ट खेळण्यांवरुनही अधिकाऱ्यांना झापलं आहे,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दरवर्षी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. मुंबई महानगरपालिकेकडून याची तयारी करण्यात येते. मात्र मुंबई महापालिकेकडून यंदा सोय नीट न झाल्याच्या तक्रारी अजित पवारांकडे करण्यात आल्या. लाखो अनुयायी या ठिकाणी येतात मात्र गॅलरी अस्वच्छ असल्याच्या तसेच अनेक तक्रारींचा पाढा स्थानिकांनी अजित पवारांसमोर वाचला. त्यानंतर अजित पवारांनी थेट महापालिका आयुक्त इक्बाल सिंहाना फोन करून या संदर्भात विचारणा केली. अजित पवारांच्या फोननंतर काही मिनिटातच इक्बाल सिंह तेथे पोहचले.
नेमकं काय घडले?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपुमख्यमंत्री अजित पवार अभिवादानासाठी सकाळी साडे सातच्या दरम्यान दादरच्या चैत्यभूमीवर पोहचले होते. अजित पवारांनी पोहचल्यानंतर चैत्यभूमीची पाहणी केली. त्यावेळी स्थानिक रहिवासी अजित राणे यांनी तक्रारी केल्या. अजित राणे यांनी केलेल्या तक्रारीवरून अजित पवारांनी आयुक्त इकबाल सिंह चहल यांना बोलावून तेथेच अस्वच्छतेवरून झापलं आहे. चैत्यभूमीवरील प्रेक्षक गॅलरीत स्वच्छता नसल्यानं अजितदादा संतापले. दादांकडून महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना विचारणा करण्यात आली, गार्डनमधील निकृष्ट खेळण्यांवरुनही अजित दादांनी अधिकाऱ्यांना या वेळी झापलं.
1 कोटीचा निधी देऊनही व्यवस्थित काम नाही, अजित पवार संतापले
अजित पवार चैत्यभूमीवर दाखल झाल्यानंतर स्थानिक नागरिक अजित राणे यांनी नारळी बागेतील अस्वच्छतेबाबत त्यांच्याकडे तक्रार केली. बागची अवस्था खूप खराब आहे. तसेच गार्डनमधील निकृष्ट खेळण्यांवरुनही तक्रार केली. तसेच एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे, पण स्वछता नाही आणि झाडांना पाणी घातले जात नाही, बागेची काळजी घेतली नाही अशा अनेक तक्रारींचा पाढा अजित पवारांसमोर त्यांनी वाचला. तक्रारीनंतर अजित पवार यांनी तातडीने मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना फोन लावला आणि याबाबत विचारणा केली. त्यावेळी आयुक्तांना मी पाहतो, असं उत्तर दिलं. यानंतर इतर अधिकाऱ्यांना देखील अजित पवार यांना जाब विचारला. 1 कोटीचा निधी देऊन व्यवस्थित काम झाले नाही म्हणून अजितदादांना अधिकाऱ्यांना झापले.