मुंबई : लोअर परळच्या पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर आज 11 तासांचा महाब्लॉक घेण्यात येणार आहे.आज रात्री दहा वाजल्यापासून ते उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही. अंधेरी, विरार, वसई, भाईंदर, बोरिवलीतून सुटणाऱ्या लोकल प्रभादेवी स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. शिवाय, मेगाब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वे मार्गवरील एकूण 205 लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
40 टन वजनी दोन क्रेनच्या मदतीने या दिवशी उड्डाणपुलाला नवे गर्डर टाकण्यात येतील. लोअर परळ स्थानकाजवळील डिलाईल पूल गंजल्याचे स्पष्ट झाल्याने पश्चिम रेल्वेने पूल तोडून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल बंद होता.
त्यामुळे मेगाब्लॉकच्या काळात लोअर परळ ते चर्चगेटदरम्यान एकही लोकल धावणार नाही. अंधेरी, विरार, वसई, भाईंदर, बोरिवलीतून सुटणाऱ्या लोकल प्रभादेवी स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत.
मेगाब्लॉकच्या या कालावधीत प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी या मार्गावर बेस्टकडून विशेष बस चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बॅकबे आणि वरळी डेपोतून प्रत्येकी तीन-तीन अशा सहा विशेष बसगाडया सोडण्यात येणार आहेत.
लोअर परळ पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर आज 'महा'ब्लॉक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Feb 2019 10:39 AM (IST)
अंधेरी, विरार, वसई, भाईंदर, बोरिवलीतून सुटणाऱ्या लोकल प्रभादेवी स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. शिवाय, मेगाब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वे मार्गवरील एकूण 205 लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -