मुंबई : अर्बन नक्षलवाद प्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना नुंबईत अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी मुंबईमध्ये ही कारवाई केली. तेलतुंबडेंवर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. पुणे न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान तेलतुंबडेंना आज न्यायालयात हजर केलं जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी डॉ. तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक केली. पुणे न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. डॉ. आनंद तेलतुंबडे काल रात्री मुंबई विमानतळावर पोहोचणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी मुंबई विमानतळावर आधीच दाखल होत पहाटे साडे तीन वाजता तेलतुंबडेंना अटक केली. आज तेलतुंबडे यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात येईल.
तेलतुंबडे यांना घेऊन निघालेलं पुणे पोलिसांचं पथक पुण्यात पोहचलं असून तेलतुंबडे यांना आज न्यायालयात हजर करण्यात येईल. एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेली डॉ. आनंद तेलतुंबडे ही नववी व्यक्ती आहे.