मुंबई : विमानाचे टायर फुटल्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुख्य रनवे अजूनही बंद आहे. यामुळे सध्या दुसऱ्या रनवेचा वापर करण्यात येत आहे. परिणामी काही उड्डाणं रद्द तर काही विमानं वळवण्यात आली आहे.

 

 

म्युनिचवरुन येणारं लुफ्तान्झा एअरलाईन्सचं एअरबस A330 या विमानाचे टायर शुक्रवारी रात्री 10.45 फुटले. लँडिंगच्या वेळी चार टाय फुटल्याने विमान धावपट्टीवरच अडकलं. सर्व 163 प्रवाशांना सुखरुपरित्या बाहेर काढलं असलं तरी विमान अजूनही तिथेच अडकलं आहे.

 

 

मात्र यामुळे चार आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. तर एक विमान हैदराबादला वळवण्यात आलं आहे.