मुंबई : मालेगाव स्फोटाप्रकरणी 9 वर्षानंतर जामीन मंजूर झालेल्या कर्नल पुरोहितांची उद्या सुटका होणार आहे. काही वेळापूर्वी मुंबई सेशन कोर्टातून पुरोहित तळोजा जेलमध्ये परतले. तुरूंग प्रशासनाच्या सर्व औपचारिकता पूर्ण करून त्यांना उद्या सोडण्यात येईल.

2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितला सोमवारी सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. पुरोहितने देश सोडू नये आणि कुठल्याही साक्षीदारास थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रलोभन दाखवू नये असं कोर्टानं म्हटलं आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर तब्बल 9 वर्षांनी पुरोहित तुरुंगातून बाहेर येणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटात जामीन मिळाल्यानंतर आपल्याया न्याय मिळाला. आता पुढील न्यायालयीन लढाईसाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दिली. तर कोर्टानं त्यांना रोखीन जामिनाची रक्कम भरण्याची परवानगी दिली आहे.

संबंधित बातम्या

ले. कर्नल पुरोहित पुन्हा मुंबई हेडक्वार्टरमध्ये ड्युटी जॉईन करणार?

2008 मालेगाव स्फोट : कर्नल पुरोहितला अखेर जामीन

मालेगाव स्फोटाचा चेहरा बनलेले प्रसाद पुरोहित यांची कहाणी आहे तरी काय?