मुंबई महानगर पालिकेला 20 ऑगस्टपर्यंत या पुलावरील युटीलिटी वायर्स काढण्यासाठीची मुदत रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. तसेच या पुलाखाली असणाऱ्या घरांनाही 20 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.
पुलाच्या पाडकामासाठी 7.2 कोटींचे टेंडर पश्चिम रेल्वेने मंजूर केले असून उद्यापासून पुलावरील डांबर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान 3 जुलै 2018 रोजी अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाची पादचारी मार्गिका कोसळून अपघात झाला होता. यामुळे दोन जणांना प्राण गमवावे लागले. तर तीन जण जखमी झाले. तसेच लोकल सेवाही मोठय़ा प्रमाणात विस्कळीत झाली.
यानंतर रेल्वे, पालिका व आयआयटी मुंबईने उड्डाणपुलांच्या केलेल्या सुरक्षा तपासणीत लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक घोषित केल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी व पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला. पूल बंद होताच परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागत आहे.
संबंधित बातम्या