Mansukh Hiren Murder Case: मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसुख हिरण हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा असल्याचं सांगण्यात येत आहे. एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, प्रदीप शर्मा यांना मनसुख हिरण यांची हत्या कर्णयातही एक मोठी रक्कम दिली होती. 


मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप शर्मा यांच्या जामिनाच्या सुनावणीवेळी एनआयएने मुंबई उच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यात असं सांगण्यात आलं आहे की,  सचिन वाझेने मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मांना 45 लाख रूपये दिले होते. यासोबतच मनसुख हिरण यांचा हत्येचा कात हा प्रदीप शर्मा यांनीच रचला होता, असं या प्रतिज्ञापत्रात एनआयएने म्हटलं आहे. हे प्रतिज्ञापत्र दाखल करत एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या जामिनाला विरोध केला आहे. याप्रकरणी आणखी काही नावे समोर येऊ शकतात. यातच हे 45 लाख रुपये नेमके दिले कोणी? सचिन वाझे यांनी दिले आहे, तर त्यांना हे पैसे दिले कोणी? याबाबत एनआयए तपास करत आहे.   


काय आहे प्रकरण? 


मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ कार प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. कारण यानंतर अनेक नाट्यमय घटना घडत गेल्या होत्या. याच काळात मनसुख हिरण यांची हत्या झाली होती. मनसुख हिरण याचा मृतदेह 5 मार्चला मुंब्र्याजवळील खाडीत सापडला होता. ज्यानंतर मनसुख हिरण याची हत्या सचिन वाझेंनीच केल्याचा आरोप त्याच्या कुटुबियांकडून करण्यात आला होता. तपास एटीएस कडून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे देण्यात आला. या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे, प्रदीप शर्मासह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Bhima Koregaon : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा सहभाग आढळला नाही, पोलिसांची न्यायालयात माहिती


महाज्योतीच्या माध्यमातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, मासिक शिष्यवृत्तीत घसघशीत वाढ