मुंबई : मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. पुढच्या दोन दिवस आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली.


मुंबईतल्या पावसाचा फटका कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही बसला. कारण सीएसएमटीहून सोडली जाणारी ट्रेन पनवेलहून सोडण्यात आली. मात्र सीएसएमटीहून पनवेलला कसं जायंच हा मोठा प्रश्न आहे. कारण हार्बर लाईवरील लोकल वाहतूक अजूनही विस्कळीत आहे.

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सर्व प्रवाशांनी सीएसएमटी स्थानकावर गर्दी केली. पण ट्रेन पनवेलहून सुटणार असल्याचं अनेकांना ऐनवेळी समजलं. त्यामुळे ट्रेन सोडण्याची वेळ आली. गावी जाण्याच्या तिकिटाचे पैसे व्यर्थ गेल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.

संबंधित बातम्या :

मुंबईत कुठे कुठे जेवण-खाण्याची आणि राहण्याची सोय?  


मुंबईतील पाऊस आणि 20 मोठे मुद्दे


मुंबईत येणारे हाय वे रोखले, पुणे, नाशिक प्रवेशद्वार बंद


मार्ग बंद, वीज गायब, तुफान पाऊस, दिवसभरात मुंबईत काय घडलं?


लोकल ठप्प, संधीचा फायदा घेत टॅक्सी, रिक्षावाल्यांकडून सर्रास लूटमार