लोकल वाहतूक ठप्प आहे, बेस्टच्या बसेस सर्वच ठिकाणी पुरेशा नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीचा पर्याय शोधावा लागत आहे. मात्र संधीचा फायदा घेत मुंबईतील रिक्षावाल्यांनी प्रवाशांची लूटमार सुरु केली आहे.
लोकल स्टेशनवर अडकलेले प्रवासी बाहेर येऊन टॅक्सी किंवा रिक्षाचा पर्याय शोधत आहेत. रिक्षावाल्यांकडून विविध कारणं देत काही मिनिटांच्या अंतरासाठी शंभर ते दोनशे रुपये प्रती व्यक्ती घेण्यात येत आहेत. त्यामुळे हा खर्च न परवडणाऱ्या प्रवाशांना नाईलाजाने बेस्ट बसचाच एकमेव पर्याय आहे.
विशेष म्हणजे कमी अंतरासाठी रिक्षावाल्यांकडून नकार दिला जातोय. तर अनेक रिक्षाचालक विनामिटर प्रवासी वाहतूक करत आहेत. विनामिटर वाहतूक करत प्रवाशांची मुंबईत सर्रासपणे लूट सुरु आहे.
लोकल वाहतूक ठप्प, बेस्टकडून या मार्गांवर अतिरिक्त बस
सायन ते मुलुंड चेकनाका – बस क्रमांक 302 – 10 बस
बॅकबे ते सांताक्रुझ – बस क्रमांक 83 – 12 बस
वडाळा ते सीएसएमटी – बस क्रमांक 10 – 2 बस
देवनार ते सीएसएमटी – बस क्रमांक C50 – 2 बस
मुंबई सेंट्रल ते टाटा पॉवर – बस क्रमांक 351 – 3 बस
हुतात्मा चौक ते अंधेरी – बस क्रमांक 84 – 2 बस
सांताक्रुझ – बस क्रमांक 28 – 2 बस
आणिक आगार ते सीएसएमटी – बस क्रमांक C6 – 4 बस
तिन्हीही लोकल मार्ग ठप्प
ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मुंबईतील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर लाईन आणि पश्चिम रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. स्टेशनमध्ये अनेक प्रवासी खोळंबलेले आहेत. तर काही लोकल स्टेशनांच्या मध्येच थांबल्याने प्रवाशांना उतरून रस्ते वाहतुकीचा पर्याय शोधावा लागत आहे.
संबंधित बातम्या :