शस्त्राचा धाक दाखवत पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये लूट
एबीपी माझा वेब टीम | 20 Dec 2016 12:27 PM (IST)
कल्याण : मुंबईतून पाटण्याला जाणाऱ्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसमध्ये लूट करण्यात आली आहे. काल रात्री साडेबाराच्या सुमारास ही लूटमार करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन ही ट्रेन रात्री साडेअकरा वाजता निघाली होती. कल्याण ते खर्डी दरम्यान 14 दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवत लूट केली आहे. या घटनेत नेमका कोणता आणि किती ऐवज लूटला गेला याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पाटलीपुत्र एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात ही लूटमार झाली आहे. लूटीची बातमी कळताच जीआरपी आणि आरपीएफनं तपास सुरु केला आहे.