Mumbai : मुंबई उपनगर जिल्ह्याअंतर्गत 2024 च्या लोकसभा (Loksabha Election 2024) निवडणुकीची जबाबदारी असणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.  मात्र, नियुक्तीपूर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी शासनाकडून विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. मात्र, अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास दांडी मारली. जे कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे, याबाबतची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.


50 हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती 


मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) साठी 50 हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे. दरम्यान नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील 5 प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत. या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य होते. गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. त्यामुळे गैरहजर राहण्याऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल


मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) साठी सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य आहे.  यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी,असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत. 










इतर महत्वाच्या बातम्या 


Prithviraj Chavan: प्रकाश आंबेडकरांनी मतांचं विभाजन करु नये, उद्या खरोखरच संविधान बदललं तर जबाबदार कोण? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल