मुंबई : मुंबईच्या वांद्रे स्टेशन बाहेर जमलेल्या परप्रांतीय मजुरांच्या गर्दीने अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं. अख्खा देश ठप्प असताना एवढी हराजोंची गर्दी रस्त्यावर कशी जमली असा प्रश्न अनेकांना आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या जमलेल्या गर्दीबाबत चिंता व्यक्त केली.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने फोन केला. संपूर्ण घटनेची त्यांनी माहिती घेतली आणि याबाबत चिंताही व्यक्त केली. अशा घटनांमुळे कोरोनाविरोधी लढाई कमकुवत होऊ शकते. यामुळे सरकारने अधिक सतर्क राहणे गरजेचं आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला आवश्यक ती मदत करण्यास तयार आहे, असंही अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं.



आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास वांद्रे स्टेशनच्या बाहेर जामा मशिदीच्या जवळ हजारो लोक जमले होते. यामध्ये अधिक परप्रांतीय मजूर होते. आम्हाला आमच्या घरी सोडा अशी येथे जमलेल्या मजुरांची मागणी होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नेते आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गर्दीला समजावण्याचा प्रयत्न केला. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सर्वांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केले. मात्र गर्दी नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर गर्दी नियंत्रणात आली. लॉकडाऊनमुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक 3 मे पर्यंत बंद आहे. राज्यांच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत हातात कामधंदा नसताना दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न या मजुरांपुढे आहे.


संबंधित बातम्या :




Bandra Crowd Issue | वांद्रे स्थानकावर हजारोंच्या संख्येने लोकांची गर्दी, गावी परत जाण्याची मागणी