नवी दिल्ली : कोरोनाची लस बनवण्याचं आव्हान भारताच्या तरुण शास्त्रज्ञांनी, डॉक्टरांनी स्वीकारावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींनी आज देशाला उद्देशून भाषण केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवल्याची घोषणा केली. या भाषणातच मोदींनी भारताच्या युवा शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचा विडा उचलण्याचं आवाहन केलं.
जगभरातील 19 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशाला या विषाणूवर लस शोधता आलेली नाही. लस तयार करण्यासाठी सुमारे 50 देशांमध्ये संशोधन चालू आहे. त्यातच आता पंतप्रधानांनी भारतीय शास्त्रज्ञांना कोरोनाची लस शोधण्याचं आवाहन केलं आहे.
Lockdown2 | 3 मेपर्यंत भारत लॉकडाऊन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचला : मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांमध्येही वेगाने काम सुरु आहे. जानेवारी महिन्यात आपल्याकडे कोरोनाच्या तपासणीसाठी केवळ एकच प्रयोगशाळा होती, आता 220 पेक्षा जास्त प्रयोगशाळांमध्ये तपासणी काम सुरु आहे. भारतात आज आम्ही एक लाखांपेक्षा जास्त बेडची व्यवस्था केली आहे. एवढंच नाही तर 600 पेक्षा जास्त अशी रुग्णालयं आहेत, जी केवल कोविड-19 च्या उपचारांसाठी काम करत आहेत. या सुविधा आणखी वेगाने वाढवल्या जात आहेत. भारताकडे आज मर्यादित साधनसामुग्री आहे. परंतु माझं देशाच्या तरुण शास्त्रज्ञांना विशेष आवाहन आहे की, जगाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी पुढे या आणि कोरोनाची लस बनवण्याचा विडा उचला."
Coronavirus | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सप्तपदी
देशातील लॉकडाऊन आणखी 19 दिवसांनी वाढलं आहे. 3 मे पर्यंत देशात लॉकडाऊन कायम राहिल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताना मोदी म्हणाले की, "3 मे पर्यंत आपल्या सर्वांना, देशाच्या प्रत्येक नागरिकाला लॉकडाऊनमध्येच राहावं लागणार आहे. या दरम्यान आपल्याला त्याचप्रकारे पालन करायचं आहे, जसं आतापर्यंत करत आलो आहोत. आता कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कोरोनाचा संसर्ग होऊ द्यायचा नाही. स्थानिक स्तरावर एक जरी रुग्ण वाढला तर तो चिंतेचा विषय असेल."
Lockdown2 | PM Narendra Modi | 3 मेपर्यंत भारत लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संपूर्ण भाषण