MegaBlock On 2nd Jan sunday : रविवारी दोन जानेवारी 2022 रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रल्वेचा मेगा ब्लॉक हा 24 तासांचा असणार आहे. ठाणे-दिवा मार्गावरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर, हार्बर मार्गावरही दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. 


2 जानेवारी पासून रेल्वे ठाणे-दिवा मार्गावर 24 तासांचा मेगाब्लॉक घेणार आहे.  रविवारी मध्यरात्री 2 वाजल्यापासून ते सोमवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. एक जानेवारीला रात्री 11.43 पासून ते दोन जानेवारीला रात्री 11.43 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थाबंणार नाहीत. पुढे मुलंड स्थानकावर अप धीम्याा मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. त्यामुळे या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या, अर्ध जलद सेवा मुलुंडहून दोन जानेवारी रोजी 5.05 पासून ते 3 जानेवारी मध्यरात्री 1.15 पर्यंत मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.






हार्बर मार्गावरही दुरुस्तीचे काम  - 
रविवारी हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.  याकालावधीत पनवेल-वाशी अशी स्पेशल लोकल धावणार आहे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.  प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. बेलापूर- खारकोपर सेवा उपलब्ध असेल; मात्र नेरुळ- खारकोपर सेवा रद्दच राहतील. 


पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१६ या वेळेत बेलापूर/पनवहार्बी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकरिता  सुटणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाण्याहून  सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलसाठी सुटणा-या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.


नेरळहून सकाळी ११.४० ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत खारकोपरसाठी  सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि खारकोपरहून दुपारी १२.२५ ते ४.२५ वाजेपर्यंत नेरूळसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. खारकोपर -बेलापूर सेवा वेळापत्रकानुसार चालणार आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी सेक्शनवर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ दरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.